भाजीपाल्याचे भाव कडाडले !

By Admin | Updated: May 13, 2014 01:16 IST2014-05-12T23:09:40+5:302014-05-13T01:16:04+5:30

बीड: सध्या बाजारात भाजीपाल्याचे भाव कडाडले आहेत़ तालुक्यातील ग्रामीण भागातून येणारा भाजीपाला पाण्याअभावी सुकू लागल्याने आवक घटली़.

Vegetable prices worried! | भाजीपाल्याचे भाव कडाडले !

भाजीपाल्याचे भाव कडाडले !

बीड: सध्या बाजारात भाजीपाल्याचे भाव कडाडले आहेत़ तालुक्यातील ग्रामीण भागातून येणारा भाजीपाला पाण्याअभावी सुकू लागल्याने आवक घटली़ परिणामी मंडी बाजार कडाडला असल्याने सर्वसामान्य गृहिणींचे कीचन बजेट कोलडले आहे. तालुक्यातील शेतकर्‍यांनी आनलेल्या भाजीपाल्यावर भावाची चढउतार चालते़ खेड्यापाड्यातून भाजी पाल्याची आवक कमी झाली की, मंडी बाजार कडाडतो हे ठरलेलेच़ मे महिन्याच्या दुसर्‍या आठवड्याच्या प्रारंभी शेतातील बोअर व विहिरीचे पाणी आटल्याने थोड्या बहुत पाण्यावर लागवड केलेला भाजी पाला पूर्णपणे सुकून गेला़ परिणामी भाववाढ झाली आहे़ बाहेरील जिल्ह्यातून फुलकोबी, सिमला मिरची बीड शहरात येत आहे़ यामध्ये लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, औरंगाबाद, नांदेड या जिल्ह्याचा समावेश असल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले़ कीचन बजेट कोलमडले भाजीपाल्याच्या भाववाढीमुळे गृहिणींचे कीचन बजेट बिघडले असल्याचे शहरातील नंदिनी देशमुख यांनी सांगितले. पंधरा दिवसापूर्वी शेतकरी स्वत: भाजीपाला घेऊन विकण्यासाठी बसायचे, परंतु आता शेतकर्‍यांकडे पाणी नसल्याने व्यापार्‍यांकडून ते सांगतील तो भाव देऊन भाजीपाला खरेदी करावा लागत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. पालेभाज्यात जास्त वाढ इतर वाणाच्या तुलनेत पाले भाज्यांच्या भावात जास्त वाढ झालेली असल्याचे पहावयास मिळत आहे. यामध्ये मेथी, कोथिंबीर, पालक यांचे देखील भाव चांगलेच कडाडले आहेत. त्यामुळे पालेभाज्या खरेदी करणे सामान्यांना परवडत नाही. भाव वाढल्याने विक्रीवरही परिणाम झाल्याचे शाकेर बागवान यांनी सांगितले. जूननंतरच भाव कमी होतील, असे जगन्नाथ वडमारे म्हणाले. (प्रतिनिधी) असे आहेत भाव भाजीजुने दरनवीन दर वांगे२०४० रू. कि. बटाटा२०२५ फुलकोबी५०६० मिरची२०५० सिमला२५४० लसूण३०६० कांदा१०१५ मेथी२०० शे.४०० शे. कोथिंबीर३०० शे५०० शे. पालक१०० शे.३०० शे.

Web Title: Vegetable prices worried!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.