आवक वाढल्याने भाज्यांचे भाव घसरले
By Admin | Updated: August 9, 2014 00:32 IST2014-08-08T23:05:27+5:302014-08-09T00:32:16+5:30
गेवराई : मागील पंधरा दिवसांपूर्वी कडाडलेले भाजीपाल्याचे भाव आवक वाढल्याने घसरले आहेत. भाजीपाला स्वस्त होत असल्याने गृहिणींनी समाधान व्यक्त केले आहे.

आवक वाढल्याने भाज्यांचे भाव घसरले
गेवराई : मागील पंधरा दिवसांपूर्वी कडाडलेले भाजीपाल्याचे भाव आवक वाढल्याने घसरले आहेत. भाजीपाला स्वस्त होत असल्याने गृहिणींनी समाधान व्यक्त केले आहे.
तालुक्यात दुष्काळी स्थिती असल्याने भाजीपाल्याचे पीक कमी प्रमाणात घेण्यात आलेले आहे. मात्र मागील आठदिवसांपासून बाहेर जिल्ह्यातील भाजीपाला आयात केला जात असल्याने आठवडी बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली. परिणामी ८० रुपये किलोने मिळणारी कोबी ४० ते ४५ रुपये किलोने ग्राहकांना मिळू लागली आहे.
दुष्काळी स्थितीमुळे बहुतांश शेतकऱ्यांनी भाजीपाल्याचे पीक घेतलेले नाही. यामुळे ग्राहकांना वाढीव पैसे देऊन भाजीपाला खरेदी करावा लागला. सध्या बाहेर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला आठवडी बाजारामध्ये येत असल्याने भाव घसरत आहेत. मात्र घसरलेला भाजीपाला अजून किती दिवस कमी भावात ग्राहकांना मिळेल हे नक्की सांगता येणार नाही, असे येथील व्यापारी रफिक बागवान यांनी सांगितले.
आज स्थितीत ८० रुपयांना मिळणारा दोडका ४० रुपये किलोवर आला आहे. या बरोबरच शेवगा, टोमॅटो, लसण, कांदे, कोबी, मेथी याचेही भाव घसरले आहेत. यामुळे गृहिणींनी समाधान व्यक्त केले आहे. यापुढे बाहेरील जिल्ह्यातून भाजीपाला आला नाही तर केंव्हाही भाजीपाल्याचे भाव कडाडू शकतील, असे येथील व्यापाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.(वार्ताहर)