शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

औरंगाबादेत संमेलनाच्या दुस-या दिवशी वेदपठण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 12:06 AM

अखिल भारतीय वैदिक संमेलनात दुस-या दिवशी शनिवारी घनपाठींनी चार वेदांचे पठण केले. यामुळे अग्रसेन भवन परिसरातील वातावरण मंगलमय झाले होते. मौखिक वेदपठणातून वैदिकांची उच्च स्मरणशक्ती, गाढा अभ्यास व वैदिक संस्कृती जपण्यासाठीच्या त्यागाची चुणूक या संमेलनात पाहण्यास मिळत आहे.

ठळक मुद्देअखिल भारतीय वैदिक संमेलन : आज होणार समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अखिल भारतीय वैदिक संमेलनात दुस-या दिवशी शनिवारी घनपाठींनी चार वेदांचे पठण केले. यामुळे अग्रसेन भवन परिसरातील वातावरण मंगलमय झाले होते. मौखिक वेदपठणातून वैदिकांची उच्च स्मरणशक्ती, गाढा अभ्यास व वैदिक संस्कृती जपण्यासाठीच्या त्यागाची चुणूक या संमेलनात पाहण्यास मिळत आहे.राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान, उज्जैन व संत ज्ञानेश्वर वेद विद्या प्रतिष्ठानतर्फे आयोजित अखिल भारतीय वैदिक संमेलनासाठी खास धर्मपीठ सजविण्यात आले होते. पर्वतरांगांच्या पार्श्वभूमीवर महर्षी यज्ञवल्यक ऋषी, संत ज्ञानेश्वर आणि गुरू-शिष्य परंपराची महती सांगणारे कटआऊट सभागृहाची शोभा वाढवीत होते. त्यातून वैदिक परंपरेचा वारसा प्रतिबिंबित केला जात होता.या धर्मपीठावर विविध राज्यांतून आलेल्या घनपाठींनी ऋग्वेद, युजर्वेद, सामवेद, अथर्ववेदाचे पठण करून सकाळी वातावरण मंगलमय केले होते. धर्मपीठावर घनपाठीवेद पठण करीत असताना समोर बसलेले घनपाठी त्यांच्यासोबत वेद पठण करीत होते. गुरू-शिष्यांच्या महान परंपरेची अनुभूती येथे बघण्यास मिळाली. वेदातील मंत्रोच्चार, स्वर, लय ऐकून सर्वजण मंत्रमुग्ध झाले होते. यानंतर वैदिक परंपरेत महिलांचे स्थान या विषयावर चर्चासत्र रंगले. यात सविता जोशी, क्रांती व्यवहारे, डॉ. मंजूषा कुलकर्णी, हभप मुकुंदकाका जाटदेवळेकर सहभागी झाले होते. दुसºया सत्रात ‘धर्माचे मूळ वेद आहे’ या विषयावरील चर्चासत्रात ज्येष्ठ वेदाभ्यासक डॉ. प्रा. ग. उ. थिटे, पं. गुलाम दस्तगीर बिराजदार, वेदमूर्ती नरेंद्र कापरे व पं. बाळकृष्ण जोशी यांनी आपले विचार मांडले.यानंतर पंडितप्रवर गणेशश्वर शास्त्री द्रविड यांच्या अध्यक्षतेखाली ‘शास्त्र सर्व कर्माचे मूळ प्रमाण आहे’ या विषयावरील चर्चासत्र गाजले. चार वेदांचे गाढे अभ्यासक, वेदमूर्ती, पुरोहित यांचा यावेळी स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. ‘वेद आणि विज्ञान’ या विषयावरील चर्चासत्रालाही नागरिकांनी गर्दी केली होती.संमेलनासाठी समितीचे अध्यक्ष अनिल भालेराव, संजय जोशी, पं. दुर्गादास मुळे, अनंत पांडव गुरुजी आदी परिश्रम घेत आहेत.वैदिक संमेलनाची रविवारी सांगतारविवारी अग्रसेन भवनात सकाळी ८ वा. वेद मंत्र पठण. ९ वा. राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी यांचे कीर्तन व त्यानंतर १० ते दुपारी १२ वाजेदरम्यान वैदिक संमेलनाचा समारोप होणार आहे. या सोहळ्यास भाजपचे राज्य अध्यक्ष रावसाहेब दानवे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.