वसुलीत बीड महसूल अव्वल
By Admin | Updated: April 1, 2015 01:01 IST2015-04-01T00:40:51+5:302015-04-01T01:01:08+5:30
बीड: विविध विविध प्रकारच्या कर वसुलीची मोहीम जिल्हा प्रशासनाने सुरू केली होती. शासनाकडून बीड महसूल विभागाला ५० कोटी २१ लाख रूपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट दिले होते

वसुलीत बीड महसूल अव्वल
बीड: विविध विविध प्रकारच्या कर वसुलीची मोहीम जिल्हा प्रशासनाने सुरू केली होती. शासनाकडून बीड महसूल विभागाला ५० कोटी २१ लाख रूपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट दिले होते. दिलेल्या उद्दिष्टापेक्षा चाळीस लाख रूपयांची जास्त वसुली बीड महसूल विभागाने केली आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बीड महसूल विभाग वससुलीमध्ये अव्वल असल्याचे मंगळवारी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ‘लोकमत’ शी सांगितले.
मागील दोन ते तीन महिन्यांपासून जिल्हा प्रशासन विभाग वसूलीच्या मोहीमेसाठी सरसावला होता. ३१ मार्च रोजी आर्थिक वर्षाचा हिशोब ताळेबंद करणे आवश्यक असते. यानुसार शासनाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त वसुली बीड महसूल विभागाने केली आहे. यामध्ये जमीन महसूल कर, जि. प. कर, कृषी कर, मोजणी शुल्क, करमणूक कर, शिक्षण व गौण खनिज कर यांचा समावेश असल्याचे वरिष्ठ अव्वल कारकून इसहाफोद्दीन सय्यद यांनी सांगितले. कर वसूली मोहीमेसाठी बीड जिल्ह्यातील सर्व उप विभागीय अधिकारी तहसीलदार यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. यावर्षी शासनाने दिलेले उद्दिष्ट ५० कोटी २१ लाख ४१ हजार एवढे होते तर बीड महसूल विभागाने ५० कोटी ९२ लाख ७५ हजार रूपयांचा कर वसूल केला असून याची टक्केवारी १०१.४२ एवढी आहे. गतवर्षीच्या तुलनेत चांगल्या प्रकारे महसूल कर वसूली झालेली आहे. मराठवाड्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत बीड पहिल्यांदाच अव्वल राहिलेले आहे. (प्रतिनिधी)