शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

‘वरूण’माया, खरीप वाया

By admin | Updated: August 6, 2015 00:09 IST

बीड : तब्बल दिड महिन्याच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात मंगळवारपासून पाऊस सक्रीय झाला. या पावसाचा करपलेल्या पिकांना फायदा नसला तरी गायब झालेला पाऊस पुन्हा

बीड : तब्बल दिड महिन्याच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात मंगळवारपासून पाऊस सक्रीय झाला. या पावसाचा करपलेल्या पिकांना फायदा नसला तरी गायब झालेला पाऊस पुन्हा सक्रीय झाल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. मंगळवारी दुपारनंतर सुरू झालेला रिमझिम पाऊस बुधवारी दिवसभर जिल्ह्यात सुरू होता. वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ १४.७५ मि. मी. पर्जन्यमान झाले आहे.मागील दोन महिन्यात पावसाने दडी मारली असल्याने शेतकरी चिंताक्रांत झाले होते. मात्र मंगळवारी दुपारी १२ नंतर रिमझिम पाऊस सुरू झाला. बुधवारी दिवसभर रिमझिम सुरू राहिल्याने वातावरण आनंदी झाले होते. सुरू असलेल्या रिमझिम पावसाने तात्काळ बोअर, विहिरींना पाणी येणे शक्य नसले तरी या रिमझिम पावसाचा जोर वाढत गेला तर पुढील एक महिन्यात जनावरांसाठी चारा उपलब्ध होऊ शकेल. यामुळे शेतकरी वर्गामधून समाधान व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)बीड : दीड महिन्याच्या उघडीनंतर पावसाचे पुनरागमन झाले असले तरी खरीप हंगामातील बाजरी व तूर या पिकांना मोठा फायदा होणार आहे.खरीपातील कापूस व सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीनचे ५० टक्के तर कापूस ३० टक्के जळून खाक झाला आहे. ते नुकसान भरून निघणे मुश्किल आहे. खरीपातील या मुख्य पिकांनाच फटका बसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील खरीपातील पेरण्या पूर्ण झाल्या असल्या तरी या रिमझिमुळे बाजरी, तूर, तीळ या पिकांची दुबार पेरणी होऊ शकत असल्याचे कृषितज्ज्ञ रामेश्वर चांडक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.खरीपातील पिकांचे नुकसान झाले असले तरी पावसाच्या पुनरागमनाने शेतकरी समाधानी आहे. किमान चाराटंचाई व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मिटणार आहे. (प्रतिनिधी)मंगळवारी झालेल्या पावसामध्ये माजलगाव तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच २०.८ मि. मी. पावसाची नोंद झाली तर सर्वात कमी आष्टी तालुक्यात ३.६ मि. मी. पावसाची नोंद झाली. आष्टीसह शिरूर कासार, पाटोदा, गेवराई तालुक्यात सर्वात जास्त दुष्काळी परिस्थिती असल्याने पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात आहे.