शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

शेती उत्तमच! टोमॅटो, कारल्याच्या उत्पादनातून वरूड काजीकरांची कोट्यवधींची कमाई

By बापू सोळुंके | Updated: July 1, 2023 12:40 IST

कृषी दिन विशेष : विविध राज्यांतील व्यापारी येतात, थेट बांधावरून नेतात माल; पाकिस्तानलाही शेतीमालाची निर्यात

छत्रपती संभाजीनगर : शेती परवडत नाही, कर्जबाजारी झालो म्हणून येथील एकाही शेतकऱ्याने गळ्याला फास लावून आत्महत्या केलेली नाही. एवढेच नव्हे तर उत्तम शेती आणि दुय्यम नोकरी असेच वरूड काजी येथील शेतकरी सांगतात. कारण येथील शेतकरी टोमॅटो आणि कारल्याच्या उत्पादनातून दरवर्षी कोट्यवधींचे उत्पन्न घेतात. येथील टोमॅटो आणि कारल्यांना देशासह अन्य देशांतूनही मागणी आहे.

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यामुळे महाराष्ट्रात हरित क्रांती झाली. यामुळे १ जुलै रोजी त्यांची जयंती राज्यात कृषी दिन म्हणून साजरी होते. छत्रपती संभाजीनगरपासून अवघ्या पाच ते सात किलोमीटर अंतरावर वरूड काजी हे सात हजार लोकसंख्येचे गाव. येथील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत भाजीपाला लागवडीला प्राधान्य दिले. दरवर्षी सातशे ते हजार एकरवर शेतकरी टोमॅटोची लागवड करीत असतात. विशेष म्हणजे बाराही महिने ते टोमॅटोचे पीक घेतात. गतवर्षी आणि याही वर्षी टोमॅटोचे दर प्रचंड घसरले. यामुळेे येथील शेतकऱ्यांनी टोमॅटोसोबतच कारल्याच्या शेतीला प्राधान्य दिले. सध्या वरूडला सुमारे ४०० एकरवर टोमॅटो आणि ३०० एकरवर कारल्याची लागवड शेतकऱ्यांनी केलेली आहे. येथील शेतकऱ्यांना त्यांचा माल विक्री करण्यासाठी कोणत्याही बाजारपेठेत जावे लागत नाही तर व्यापारीच येऊन खरेदी करतात. या गावातून रोज १३ ते १५ ट्रक टोमॅटो आणि कारले विविध राज्यांत जातात.

पाकिस्तानमध्येही व्हायची टोमॅटोची निर्यातभारत आणि पाकिस्तानची आयात, निर्यात सध्या बंद आहे. याचा फटका वरूड काजीच्या शेतकऱ्यांना बसल्याचे शेतकरी सांगतात. सरकारने निर्यातबंदी करण्यापूर्वी येथील टोमॅटोची शेतकऱ्यांनी दुबई आणि पाकिस्तानला निर्यात केली होती, असे शेतकरी सांगतात.

दर अस्थिर झाले तरी लाखोंची कमाईआम्ही खूप कमी रासायनिक खत आणि कीटकनाशकांचा वापर करतो. दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि राजस्थानमधील व्यापारी आमच्या बांधावर येतात. टोमॅटोचे दर अस्थिर असले तरी आम्हाला सरासरी ४० लाखांच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. तसेच कारल्यातूनही एकरी १० ते ११ लाखांचे उत्पन्न मिळू शकेल. डाळिंबातूनही मिळणारे उत्पन्न वेगळे असेल.- संजय दांडगे, शेतकरी

टोमॅटो आणि कारल्यास प्राधान्यज्यांची शेती पावसावर अवलंबून आहेत तेही आणि ज्यांच्याकडे बारा महिने सिंचनाची सोय आहेत तेही शेतकरी नियमित टोमॅटो आणि कारल्याची शेती करतात. यातून लाखोंचे उत्पादन होते.- योगेश दांडगे, शेतकरी

विदेशातही जातो माल आमचे गाव अनेक वर्षांपासून टोमॅटो उत्पादनासाठी संपूर्ण देशभरातील व्यापाऱ्यांमध्ये प्रसिद्ध आहे. आमचा माल विदेशातही जातो.-डॉ. दिलावर बेग, सरपंच

 

टॅग्स :FarmerशेतकरीAurangabadऔरंगाबादvegetableभाज्या