रंगनाथ काळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:30 IST2020-12-17T04:30:47+5:302020-12-17T04:30:47+5:30
सोयगाव येथील जि. प. प्रशालेतील विद्यार्थ्यांना वही, पेन वाटप करण्यात आले. तसेच याप्रसंगी पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. ज्ञानेश्वर महाविद्यालयात ...

रंगनाथ काळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम
सोयगाव येथील जि. प. प्रशालेतील विद्यार्थ्यांना वही, पेन वाटप करण्यात आले. तसेच याप्रसंगी पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. ज्ञानेश्वर महाविद्यालयात खा. शरद पवार यांचा कार्यक्रम ऑनलाईन पाहण्यासाठी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी अंभोरे, उपप्राचार्य डॉ. रावसाहेब बारोटे, डॉ. शिरीष पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष डॉ. इंद्रसिंह सोळुंके, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र आहिरे, शहराध्यक्ष रवींद्र काळे, युवक तालुकाध्यक्ष राजू दुतोंडे, युवक शहराध्यक्ष प्रमोद पाटील, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सुधाकर सोहनी, मागासवर्गीय सेल तालुकाध्यक्ष राजू बिऱ्हारे, चंद्रकांत काळे, प्रा. शंतनू चव्हाण, प्रा. किशोर नाले आदींची यावेळी उपस्थिती होती. तसेच मंगळवारी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रा. शंतनू चव्हाण यांनी दिली.
छायाचित्र ओळ : सोयगाव येथील जि. प. प्रशालेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने साहित्य वाटप करतांना कार्यकर्ते.