मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 23:57 IST2017-09-16T23:57:10+5:302017-09-16T23:57:10+5:30
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त १७ सप्टेंबर रोजी जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शहरातील राजगोपालचारी उद्यानात मुख्य ध्वजारोहण होणार आहे.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विविध कार्यक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त १७ सप्टेंबर रोजी जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शहरातील राजगोपालचारी उद्यानात मुख्य ध्वजारोहण होणार आहे.
जिल्ह्यात कमी पर्जन्यमान असलेल्या तालुक्यातील शेतकºयांना कृषीपंपासाठी अतिरिक्त वीजपुरवठा करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विश्रामगृहावर सकाळी १० वाजता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सकाळी ११ ते १ या वेळेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात रब्बी शेतकरी मेळावा व कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून उपमहानिदेशक डॉ.नरेंद्रसिंह राठोड, कुलगुरु डॉ.बी.व्यंकटेस्वरलू, खा. बंडू जाधव, जि.प. अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, विधानपरिषद सदस्य सतीश चव्हाण, आ.विक्रम काळे, आ.बाबाजानी दुर्राणी, रामराव वडकुते, आ.डॉ.राहुल पाटील, आ.विजय भांबळे, आ.मधुसूदन केंद्रे, आ. मोहन फड, महापौर मीनाताई वरपूडकर आदींची उपस्थिती राहणार आहे.