गणेशोत्सवात खडा पहारा
By Admin | Updated: August 31, 2014 00:14 IST2014-08-31T00:00:48+5:302014-08-31T00:14:02+5:30
नांदेड: जिल्ह्यात जवळपास ९०० पेक्षा अधिक मंडळांनी श्री गणेशाची स्थापना केली आहे़ गणेशोत्सवाच्या काळात काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाभरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे़

गणेशोत्सवात खडा पहारा
नांदेड: जिल्ह्यात जवळपास ९०० पेक्षा अधिक मंडळांनी श्री गणेशाची स्थापना केली आहे़ गणेशोत्सवाच्या काळात काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाभरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे़ त्यासाठी इतर जिल्ह्यातूनही अधिकची कुमक मागविण्यात आली आहे़
या बंदोबस्तामध्ये महत्वाच्या ठिकाणी फिक्स पॉर्इंट, पायी पेट्रोलिंग, मोबाईल पेट्रोलिंग, बिट मार्शल पेट्रोलिंग, छेडछाड विरोधी पथक, घातपात विरोधी पथक, तपास पथक, साध्या पथकातील पोलिस बंदोबस्त अशी आखणी करण्यात आली आहे़ तसेच या बंदोबस्ताकरीता २ अप्पर पोलिस अधीक्षक, ९ पोलिस उपअधीक्षक, ३८ पोलिस निरीक्षक, सपोनि, पोउपनि १५०, पोलिस कर्मचारी २८०० असे जिल्ह्यातील मनुष्यबळ आहे़ तर इतर जिल्ह्यातून ५ पोलिस उपअधीक्षक, ५ पोलिस निरीक्षक, २० पोउपनि, आरपीटीएसहून १०० पुरुष व ५० महिला, १००० पुरुष होमगार्ड व २०० महिला होमगार्ड, एसआरपीएफची १ कंपनी असे मनुष्यबळ मागविण्यात आले आहे़ पोलिस अधीक्षक परमजितसिंह दहिया हे स्वताहा बंदोबस्तावर लक्ष ठेवून आहेत़ तसेच नागरिकांनीही गणेशोत्सव आनंद, शांततापूर्ण वातावरणात साजरा करावा असे आवाहन त्यांनी केले आहे़ (प्रतिनिधी)