बाळापूरच्या सरपंचपदी वंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:04 IST2021-02-09T04:04:56+5:302021-02-09T04:04:56+5:30

(फोटो) औरंगाबाद : बाळापूरच्या (ता. औरंगाबाद) सरपंचपदी वंदना गणेश वाघ, तर उपसरपंचपदी अर्जुन रावसाहेब जौक यांची बिनविरोध निवड करण्यात ...

Vandana as Sarpanch of Balapur | बाळापूरच्या सरपंचपदी वंदना

बाळापूरच्या सरपंचपदी वंदना

(फोटो)

औरंगाबाद : बाळापूरच्या (ता. औरंगाबाद) सरपंचपदी वंदना गणेश वाघ, तर उपसरपंचपदी अर्जुन रावसाहेब जौक यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर ढोलताशाच्या गजरात ग्रामस्थांनी फुलांची उधळण केली. सोमवारी (दि. ८) दुपारी २ वाजता सरपंच, उपसरपंच निवड सभेचे आयोजन करण्यात आले होते. दिलेल्या मुदतीत दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने सरपंचपदी वंदना वाघ, तर उपसरपंचपदी अर्जुन जौक यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

नवनियुक्त सरपंच, उपसरपंच यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मीबाई पवार, सुनीता औताडे, नीता गिरे यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थ महिलांनी ग्रामपंचायत पदाधिकारी यांचे औक्षण करत स्वागत केले. अध्याशी अधिकारी म्हणून तहसीलचे अधिकारी हपत यांनी काम पाहिले. त्यांना तलाठी बिरारे, ग्रामसेवक डी.पी. शिंदे यांनी सहकार्य केले. या वेळी पॅनलप्रमुख सुभाष पवार, दत्तू वाघ, गणेश वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

Web Title: Vandana as Sarpanch of Balapur