शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

'वंचित'ची आता काँग्रेसशी बोलणी नाही; पहिली यादी ५ सप्टेंबर रोजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 13:05 IST

५० उमेदवारांची पहिली यादी होणार जाहीर

औरंगाबाद : ३१ आॅगस्ट ही डेडलाईन संपली आहे. त्यामुळे आता काँग्रेसशी बोलणी होणार नाही. वंचित बहुजन आघाडीची जवळपास ५० उमेदवारांची पहिली यादी ५ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येईल, असे आज येथे वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश देखरेख समितीचे अध्यक्ष अर्जुन सलगर यांनी जाहीर केले. 

वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा, शहर व तालुका पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतील सूचना ऐकून घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. समितीचे सदस्य दीपक मोरे व अतुल बहुले यांनी बैठकीस मार्गदर्शन केले. पहिल्या   यादीत ओबीसींमधील सूक्ष्म जातीच्या उमेदवारांचा समावेश राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. 

फरकच समजत नाहीबैठकीत डॉ. संदीप घुगरे यांनी भारिप- बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडी यातला फरकच समजत नसल्याची तक्रार केली. हे स्पष्ट झाले पाहिजे. अन्यथा ओबीसी दूर जाऊ शकतात, असा इशारा दिला. मात्र यावर देखरेख समितीने खुलासा केला नाही. वंचित बहुजन आघाडी हा पक्ष आहे. त्यात भारिप- बहुजन महासंघ लवकरच विलीन होईल, असे ते म्हणाले. वंचितचा विरोधी पक्षनेता होईल, असं  मुख्यमंत्री सांगताहेत पण आता वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर हे मुख्यमंत्री होतील, हे लक्षात ठेवा, असे अ‍ॅड. सुभाष माने यांनी जाहीर केले. 

ओबीसींचे आरक्षण हटविण्याचा डाव.... संघप्रमुख मोहन भागवत यांनी आरक्षणाची समीक्षा करा म्हणताच महाराष्ट्रात ओबीसींचे राजकीय आरक्षण कमी केल्याचा जीआर काढणं हा योगायोग नाही. याबद्दल जनजागृती करणं हेही आमच्या समितीचं काम असल्याचं सलगर यांनी सांगितले. रवी तायडे यांनी सूत्रसंचालन केले. महेश निनाळे, बाबासाहेब पवार, उद्धव बनसोडे, श्रीरंग ससाणे, जया गजभिये, रेखा उजगरे, डॉ.शरदचंद्र वानखेडे आदींनी यावेळी मते मांडली.

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीcongressकाँग्रेसvidhan sabhaविधानसभाAurangabadऔरंगाबाद