अजिंठ्याच्या डोंगरातील वणवा १४ तासांनी नियंत्रणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:04 IST2021-05-07T04:04:51+5:302021-05-07T04:04:51+5:30
सोयगाव : तालुक्याच्या हद्दीला लागूनच असलेल्या अजिंठ्याच्या डोंगररांगांमध्ये बुधवारी रात्री आग लागली. वन विभागाच्या पथकाने १४ तास शर्तीचे प्रयत्न ...

अजिंठ्याच्या डोंगरातील वणवा १४ तासांनी नियंत्रणात
सोयगाव : तालुक्याच्या हद्दीला लागूनच असलेल्या अजिंठ्याच्या डोंगररांगांमध्ये बुधवारी रात्री आग लागली. वन विभागाच्या पथकाने १४ तास शर्तीचे प्रयत्न करून अख्खी रात्र डोंगरात घालवत वणवा नियंत्रणात आणला, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ यांनी दिली. ही आग नियंत्रणात आणताना चार ते पाच कर्मचारी भाजले आहेत.
अजिंठा डोंगराच्या कळसुदेवी, जोगेश्वरी व इंद्रगढी मंदिराच्या खाली अतितीव्र उतार व दुर्गम ठिकाणी आग लागली होती. या आगीला नियंत्रणात आणण्यासाठी सोयगाव वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रात्री घटनास्थळी धाव घेतली. तीव्र उतार, खोल कडे-कपारी व दुर्गम भागात आग लागली असल्याने वन कर्मचाऱ्यांना त्याठिकाणी पोहचणे शक्य नव्हते. अखेर चार पथके तयार करण्यात आली. यावेळी जीवाची पर्वा न करता नियोजनपूर्वक वन कर्मचाऱ्यांनी आग नियंत्रणात आणली. याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ अनिल पाटील, सिल्लोड वन विभागाचे वनपाल अमोल राऊत, नितेश मुल्ताने, कृष्णा पाटील, योगेश बोखारे, सुदाम राठोड, महादेव शिंदे, सविता सोनवणे, दशरथ चौधरी, झामू पवार यांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.
060521\ynsakal75-0712171217_1.jpg
अंजिठा डोंगररांगात लागलेली आग.