घाटीत सुपरस्पेशालिटी उपचार
By Admin | Updated: November 2, 2014 00:23 IST2014-11-02T00:12:34+5:302014-11-02T00:23:09+5:30
औरंगाबाद :घाटी रुग्णालयात (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय) दाखल होणाऱ्या रुग्णांना लवकरच सर्व गंभीर आजारांवरील सुपरस्पेशालिटी उपचार उपलब्ध होणार आहे.

घाटीत सुपरस्पेशालिटी उपचार
औरंगाबाद : गरिबांचे रुग्णालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घाटी रुग्णालयात (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय) दाखल होणाऱ्या रुग्णांना लवकरच सर्व गंभीर आजारांवरील सुपरस्पेशालिटी उपचार उपलब्ध होणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या साहाय्याने घाटीत २०० खाटांचा स्वतंत्र सुपरस्पेशालिटी विभाग सुरू होणार आहे. या विभागासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून १५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सुपरस्पेशालिटी विभागाच्या इमारतीसाठी प्रशासनाने उपलब्ध केलेल्या जागेची पाहणी केंद्रीय पथकाने ३१ आॅक्टोबर रोजी केली.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देशातील शासकीय रुग्णालयातील उपलब्ध आरोग्य सुिवधांचे अपग्रेडेशन करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. गतवर्षी यासाठी घाटीची निवड झाली. मराठवाड्यातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय म्हणून घाटीची ओळख आहे. या रुग्णालयात मराठवाडा आणि शेजारील जिल्ेंतील रुग्ण दाखल होतात. काही वर्षांपूर्वी तेथे स्वतंत्र नवजात शिशू अति दक्षता कक्ष सुरू झाला. या विभागात गंभीर आजारासह जन्मलेल्या बाळांवर उपचार केले जातात. विभाग चिमुकल्यांसाठी आशेचा किरण ठरला आहे. या सुपरस्पेशालिटी युनिटप्रमाणेच उरोशल्यचिकित्सा आणि हृदयरोग विभागही २००९ मध्ये सुरू झाला. या विभागामुळे विभागातील हृदयरोग्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याशिवाय कृत्रिम मूत्रपिंड प्रत्यारोेपण आणि मूत्ररोग विभागाची स्वतंत्र इमारत घाटीत उभारण्यात आली. यासोबतच सर्जरी विभाग, घाटी रुग्णालयात २०० खाटांचा स्वतंत्र सुपरस्पेशालिटी विभाग सुरू करण्यात येणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून तब्बल १५० कोटी रुपये मिळणार आहेत. सुपरस्पेशालिटीची इमारत बांधण्यासाठी उपलब्ध जागेची पाहणी करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील आर्किटेक्ट जयेंद्र नामदेव यांनी ३१ आॅक्टोबर रोजी घाटीला भेट दिली. यावेळी अधिष्ठाता डॉ. के.एस.भोपळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश मगरे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता यांनी सर्जरी इमारतीच्या मागील जागा इमारतीसाठी उपलब्ध असल्याचे दाखविले. ही जागा आर्किटेक्ट जयेंद्र यांनी पसंत केल्याचे घाटीच्या सूत्राने सांगितले.
स्वतंत्र विभागात होणार ४ विभागांचे स्थलांतर
सुपरस्पेशालिटी विभागाच्या इमारतीत सर्जरी, कान, नाक, घसा, आॅर्थोपेडिक आणि भूलशास्त्र विभागाचे स्थलांतर केले जाणार आहे. कान, नाक, घसा विभागात बहिरेपणा घालविणारे कृत्रिम कर्णरोपण शस्त्रक्रिया तज्ज्ञ करतील. आॅर्थोपेडिक विभागात खुबा प्रत्यारोपण, गुडघा प्रत्यारोपण, खांदा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे डॉक्टरांना शक्य होणार आहे. सर्जरी विभागातही अत्यंत गुंतागुंतीच्या आणि किचकट शस्त्रक्रिया केल्या जातील.