घाटी रुग्णालयामध्ये कचरा जाळणे सुरू
By | Updated: December 2, 2020 04:04 IST2020-12-02T04:04:43+5:302020-12-02T04:04:43+5:30
पर्यटन बसची दुरवस्था औरंगाबाद : एसटी महामंडळाकडील पर्यटन बसची दुरवस्था झाली आहे. या बसला जागोजागी चिकटपट्ट्या लावण्यात आल्या आहे. ...

घाटी रुग्णालयामध्ये कचरा जाळणे सुरू
पर्यटन बसची दुरवस्था
औरंगाबाद : एसटी महामंडळाकडील पर्यटन बसची दुरवस्था झाली आहे. या बसला जागोजागी चिकटपट्ट्या लावण्यात आल्या आहे. त्यामुळे बसच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. याविषयी प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे. ही बस सध्या पुणे मार्गावर चालविण्यात येत आहे.
बाह्यरूग्ण विभागासमोर हातगाड्यांच्या रांगा
औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागासमोरच फळ, खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या हातगाड्या लावल्या जात आहे. पाणचक्की रोडवरून आता हातगाड्यांनी थेट घाटीत घुसघोरी केली आहे. याकडे घाटी प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
‘सचखंड’ने जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय
औरंगाबाद : नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस ही रोज दुपारी दीड वाजता रवाना होते. त्यासाठी येणाऱ्या प्रवाशांना बाहेर मिळेल त्या जागेत थांबावे लागत आहे. अमृतसर-नांदेड सचखंड एक्सप्रेसने येणारे प्रवासी रवाना झाल्यानंतरच जाणाऱ्या प्रवाशांना स्टेशनच्या आतमध्ये सोडले जात आहे.
निवासस्थानावर वाढली झाडेझुडपे
औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील मेडिसीन विभागासमोर असलेल्या कर्मचारी निवासस्थानाच्या इमारतीवर जागोजागी झाडेझुडपे वाढली आहेत. यामुळे इमारत कमकुवत होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे याकडे लक्ष देऊन झाडेझुडपे हटविण्याची मागणी रहिवाशांकडून होत आहे.