अन्ननलिकेत अडकलेला सेल काढण्यात घाटीच्या डॉक्टरांना यश

By Admin | Updated: June 15, 2014 00:54 IST2014-06-15T00:41:07+5:302014-06-15T00:54:12+5:30

औरंगाबाद : तान्हुल्या बाळाकडे लक्ष न दिल्यास त्याच्या जीवावर बेतू शकते. लहान मुले खेळत असताना त्यांना दिसेल ती वस्तू ते तोंडात घालत असतात.

Valley doctors achieve success in removing a stuck in an esophagus | अन्ननलिकेत अडकलेला सेल काढण्यात घाटीच्या डॉक्टरांना यश

अन्ननलिकेत अडकलेला सेल काढण्यात घाटीच्या डॉक्टरांना यश

औरंगाबाद : तान्हुल्या बाळाकडे लक्ष न दिल्यास त्याच्या जीवावर बेतू शकते. लहान मुले खेळत असताना त्यांना दिसेल ती वस्तू ते तोंडात घालत असतात. अशा वस्तू त्यांच्यासाठी प्राणघातक ठरू शकतात. अशाच एका बाळाने बॅटरीवर चालणाऱ्या गाडीचे सेल गिळल्याची घटना खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी येथे घडली. त्याच्या अन्ननलिकेत अडकलेला सेल बाहेर काढण्यात घाटीतील कान, नाक, घसा विभागातील डॉक्टरांना यश मिळाल्याने चिमुकल्यास जीवदान मिळाले आहे.
घाटीतील कान, नाक, घसा विभागप्रमुख डॉ. जीवन वेदी यांनी सांगितले की, खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी येथील रहिवासी दर्शन सोपान शेगडे हा दोन वर्षीय बालक ११ जून रोजी बॅटरीवर चालणारी मोटारगाडी खेळत होता. खेळताना बॅटरीचा सेल खाली पडला. काही क्षणांत त्याने तो सेल उचलला आणि तोंडात टाकला.
ही बाब दर्शनच्या आईच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याच्या तोंडातील सेल बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत त्याने तो गिळला होता. त्यानंतर काही वेळातच त्यास उलट्या आणि संडासचा त्रास सुरू झाला.
नातेवाईकांनी दर्शनला खुलताबाद येथील खाजगी डॉक्टरांना दाखविले. त्यांनी तपासून घाटीत नेण्याचा सल्ला दिला. बुधवारी रात्री ८ वाजता दर्शनला घाटीतील अपघात विभागात दाखल केले. त्यानंतर कान, नाक, घसा विभागाच्या डॉक्टरांनी त्याला तपासले. दर्शनवर अगोदर उलट्या आणि संडास थांबण्यासाठी औषधोपचार करण्यात आले. गुरुवारी दुपारी बाळाचा एक्स-रे काढण्यात आला. एक्स-रेमध्ये गिळलेला सेल दिसत नव्हता.
शेवटी अस्थिव्यंगोपचार विभागातील सी. आर्म या यंत्रावर त्याची तपासणी करण्यात आली. तेव्हा सेल कोठे अडकला आहे हे स्पष्टपणे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यानंतर दर्शनला आॅपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी दुर्बिणीद्वारे त्याच्या अन्ननलिकेत अडकलेला सेल बाहेर काढला. ही प्रक्रिया डॉ. वेदी, डॉ. अनुश्री बजाज, डॉ. स्वाती सावंत, डॉ. आनंद तुळजापूरकर, डॉ. सचिन बनसोड यांनी केली. भूलतज्ज्ञ डॉ. रश्मी बेंगाली यांनी त्यांना सहकार्य केले.

Web Title: Valley doctors achieve success in removing a stuck in an esophagus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.