वाजतगाजत महालक्ष्मीचे आगमन
By Admin | Updated: September 20, 2015 01:11 IST2015-09-20T00:56:00+5:302015-09-20T01:11:04+5:30
औरंगाबाद : परिवारातील सर्व जण पारंपरिक गाणे गात होते आणि सुवासिनी सजविलेल्या परातीत महालक्ष्मीचे मुखवटे घेऊन चालत होत्या...

वाजतगाजत महालक्ष्मीचे आगमन
औरंगाबाद : परिवारातील सर्व जण पारंपरिक गाणे गात होते आणि सुवासिनी सजविलेल्या परातीत महालक्ष्मीचे मुखवटे घेऊन चालत होत्या... वाजतगाजत महालक्ष्मी घरात आणण्यात आल्या. श्री गणेशापाठोपाठ महालक्ष्मीचेही घराघरांत आगमन झाल्याने सर्वत्र मांगल्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
भाद्रपद शुद्ध सप्तमीला महालक्ष्मीचे आगमन झाले. भाद्रपद शुक्ल पक्षाच्या ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन होत असल्यामुळे त्यांना जेष्ठा गौरी असेसुद्धा म्हटले जाते. गणेशोत्सवाच्या काळात येणारा हा सण गौरी गणपती म्हणूनही ओळखला जातो. कुठे दुपारी, तर कुठे सायंकाळच्या वेळी महालक्ष्मी वाजत-गाजत आणण्यात आल्या. यंदा महालक्ष्मीच्या साजशृंगारात ‘जय मल्हार’ मालिकेतील दागिन्यांचा प्रभाव दिसून आला. काही जणांनी खास म्हाळसेचे कानातले, बानूची नथ, वेल, बांगड्या खरेदी करून महालक्ष्मीला सजविले होते. उद्या रविवारी २० रोजी महालक्ष्मीची पूजा व आरती करण्यात येणार आहे.