अंबाजोगाईत वैष्णवांचा मेळा
By Admin | Updated: July 4, 2016 00:33 IST2016-07-03T23:55:58+5:302016-07-04T00:33:10+5:30
अंबाजोगाई : आषाढीनिमित्त पंढरपूरकडे निघालेल्या नर्सी येथील संत नामदेव पालखीसह इतर दिंड्या रविवारी येथील योगेश्वरी स्टेडियमवर दाखल झाल्या.

अंबाजोगाईत वैष्णवांचा मेळा
अंबाजोगाई : आषाढीनिमित्त पंढरपूरकडे निघालेल्या नर्सी येथील संत नामदेव पालखीसह इतर दिंड्या रविवारी येथील योगेश्वरी स्टेडियमवर दाखल झाल्या. यावेळी पारंपरिक पध्दतीने अश्वरिंगण सोहळा मोठ्या हर्षोल्हासात पार पडला. ज्ञानोबा तुकारामाचा जयघोषाने परिसर दुमदुमला. भक्तीच्या या सोहळ्यात वारकरी व अंबाजोगाईकर जणू चिंब न्हाऊन निघाले.
नांदेड जिल्ह्यातील नरसी नामदेव, तिरूपती बालाजी दिंडी आकोट, कोंडूर (जि. हिंगोली) येथील संत विठोबा बाबा, गणोरी (जि. अमरावती) येथील महमंद खान महाराज व अकोला येथील भाऊसागर माऊली आदी पालख्या शहरात दाखल झाल्या. टाळ-मृंदगासह विठ्ठनामाच्या गजरात आलेल्या दिंड्यांचे बँड पथक व फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत झाले. ध्वजारोहण, पालखी पूजन व अश्वपूजा करण्यात आली. यानंतर रिंगण सोहळा पार पडला. सजविलेला अश्व, भगवी पताका हाती घेतलेले वारकरी लक्ष वेधून घेत होते. संत ज्ञानेश्वरांनी भिंत चालविलेल्या देखाव्याची प्रशंसा झाली. कुस्त्या, महिलांच्या फुगडया व मैदानी खेळ हे आकर्षण ठरले. नंदकिशोर मुंदडा, दिलीप साांगळे, अंकुशराव काळदाते, प्रकाश बोरगावकर, सुधाकर महाराज शिंदे, मारूतीराव रेड्डी, बाबामहाराज जवळगावकर, पं. उद्धवराव आपेगावकर, जयकुमार लोढा, डॉ. नरेंद्र काळे, श्रीरंग सुरवसे, नूर पटेल, बळीराम चोपणे, वैजनाथ देशमुख, अनिकेत देशपांडे, दिलीप गित्ते, अनंत आरसुडे, विनोद मुंदडा, शंकर उबाळे, सुनील मुथ्था उपस्थित होते. (वार्ताहर)