वैद्यनाथ कारखाना निवडणुकीत कोण ठरणार सरस ?
By Admin | Updated: April 7, 2015 01:24 IST2015-04-07T00:30:40+5:302015-04-07T01:24:29+5:30
परळी : वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत पालकमंत्री पंकजा मुंडे व विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यात जोरदार चुरस आहे

वैद्यनाथ कारखाना निवडणुकीत कोण ठरणार सरस ?
परळी : वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत पालकमंत्री पंकजा मुंडे व विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यात जोरदार चुरस आहे. या लढाईत कोण बाजी मारणार? याचीच चर्चा सध्या तालुक्यात आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने मुंडे बहीण-भाऊ एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. पंकजा यांच्या मदतीला अॅड. यशश्री मुंडे ही धाकटी बहीण आहे तर धनंजय यांच्यासाठी वडिल पंडितराव मुंडे धावून आले आहेत. उमेदवारी दाखल केल्यानंतर छानणीदरम्यान आक्षेप नोंदविल्यामुळे पंडितराव मुंडे व धनंजय मुंडे यांच्यासह २१ जणांचे अर्ज बाद ठरले आहेत. त्यामुळे तूर्त मुंडे पिता-पुत्र मैदानाबाहेर आहेत. साखर सहसंचालकांच्या सुनावणीवर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. कारखान्यावर सत्ता मिळविण्यासाठी दोन्ही गटांनी जोरदार प्रयत्न सुरू केल्याने निवडणूक पहिल्यांदाच लक्षवेधी ठरत आहे. (वार्ताहर)