विमा भरताना शेतकरी मेटाकुटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 23:48 IST2017-07-28T23:48:54+5:302017-07-28T23:48:54+5:30

परभणी : परभणी शहरातील जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँकांमध्ये पीक विमा भरण्यासाठी शुक्रवारी सकाळपासूनच शेतकºयांनी गर्दी केली होती. जिल्हा बँकेने मोठ्या प्रमाणात शेतकºयांचे अर्ज स्वीकारले. अर्ज दाखल करण्यासाठी शेतकºयांनी पहाटेपासूनच बँकेसमोर रांगा लावल्या होत्या.

vaimaa-bharataanaa-saetakarai-maetaakautailaa | विमा भरताना शेतकरी मेटाकुटीला

विमा भरताना शेतकरी मेटाकुटीला

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परभणी शहरातील जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँकांमध्ये पीक विमा भरण्यासाठी शुक्रवारी सकाळपासूनच शेतकºयांनी गर्दी केली होती. जिल्हा बँकेने मोठ्या प्रमाणात शेतकºयांचे अर्ज स्वीकारले. अर्ज दाखल करण्यासाठी शेतकºयांनी पहाटेपासूनच बँकेसमोर रांगा लावल्या होत्या. आॅनलाईन सर्व्हर व्यवस्थित चालत नसल्याने हे अर्ज भरण्यास वेळ लागत होता. परिणामी शेतकºयांची अस्वस्थता वाढत होती. त्यामुळे शेतकरी सुकाणू समितीच्या पदाधिकाºयांच्या नेतृत्वाखाली दुपारी २.३० वाजेच्या सुमारास शेतकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चा जिल्हा कचेरीवर आल्यानंतर जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. त्यामध्ये शेतकºयांचे अर्ज आॅफ लाईन स्वीकारावेत, पीक विमा अर्ज दाखल करण्यात मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी कॉ.विलास बाबर, कॉ.लिंबाजी कचरे, गणेश घाटगे, सुरेश भुमरे, माऊली कदम, माऊली जोगदंड, पुरभाजी कोलगणे, शिवाजी गमे, पंडित शिंदे, आत्माराम दंडवते, परमेश्वर वरकड, प्रल्हाद धस, विठ्ठल धस, राजाभाऊ पवार, सुभाषराव काळदाते, अशोक शेळके, बापूराव गमे आदींची उपस्थिती होती.
ल्ल‘दत्तक बँकांनी विमा हप्ता स्वीकारावा’
गंगाखेड- पीक विमा भरण्यासाठी अवधी कमी असल्याने तसेच अद्यापपर्यंत बँकांनी पीक विमा भरुन घेण्यास सुरुवात केली नसल्याने हतबल झालेले शेतकरी बँकाबाहेर गर्दी करीत आहेत. काही शेतकºयांनी पीक विमा भरुन घेत नसल्याची तक्रार केल्याने आ.मधुसूदन केंद्रे यांनी शेतकºयांना येणाºया अडचणी तहसीलदार आसाराम छडीदार यांच्यासमोर मांडल्या. २८ जुलै रोजी तहसीलदार छडीदार यांनी सर्व बँकांचे शाखा व्यवस्थापक व कृषी विभागातील कर्मचाºयांची बैठक घेऊन दत्तक बँकांनी विमा हप्ता स्वीकारावा, असे आदेशित केले. या बैठकीस नायब तहसीलदार गंगाधर काळे, कांतीलाल महाजन, पोलीस निरीक्षक सोपान सिरसाट, एसबीआयचे मदनकुमार झा, व्ही.एच.नांदे, प्रकाश राठोड, लक्ष्मण मुंडे, लिंबाजी देवकते, त्र्यंबकराव मुरकुटे, सदाशीव भोसले, शिवाजी मुठाळ, एच.बीे.कदम, नंदू खाकरे, नितीन बडे, मुरली नागरगोजे, दत्तराव जाधव, विनायक राठोड, ज्ञानोबा फड यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
ल्लसेलूत शेतकरी ताटकळले
सेलू- पीक विमा भरण्याची मुदत दोन दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे महा ई-सेवा केंद्र व बँकांमध्ये आलेल्या शेतकºयांना इंटरनेट वारंवार बंद पडत असल्यामुळे दिवसभर ताटकळत बसावे लागले. दरम्यान, शुक्रवारीही इंटरनेटचा अडथळा कायम राहिल्यामुळे शेतकरी हैराण झाले. राष्ट्रीय बँका पीक विमा भरुन घेत नसल्यामुळे शेतकरी विमा भरण्यासाठी शहरातील महा ई-सेवा केंद्रावर येत आहेत. परंतु, तासन्तास इंटरनेट बंद पडत असून त्याची गती संथ असल्याने पीक विमा भरण्यासाठी शेतकºयांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
ल्लवस्सा येथे बँकेत गर्दी
जिंतूर तालुक्यातील वस्सा येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेत पीक विमा भरण्यासाठी शेतकºयांची मोठी गर्दी होत आहे. पीक विमा भरण्याची अंतिम मुदत दोन दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे शेतकºयांची गर्दी वाढत आहे. संकेतस्थळ वारंवार ठप्प पडत असल्यामुळे शेतकरी आक्रमक होऊ लागले आहेत. तसेच अधिकारी व शेतकºयांत शाब्दिक चमकही होत आहे.
ल्लजिंतुरात रात्रीपासून रांगा
जिंतूर तालुक्यातील शेतकºयांना पीक विमा भरताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यातच महा ई-सेवा केंद्र चालक आर्थिक पिळवणूक करीत आहेत. पीक विम्याचा प्रस्ताव दाखल करण्यासाठी आपला नंबर अगोदर यावा, यासाठी तालुक्यातील शेतकरी रात्रीपासूनच महा ई-सेवा केंद्र व बँकांसमोर रांगा लावत असल्याचे चित्र शुक्रवारी पहावयास मिळाले. जिंतूर तालुक्यातील आडगाव बाजार, चिंचोली दराडे, घेवंडा, धानोरा, हनवतखेडा, ब्राह्मणगाव, बेलखेडा, अकोली या गावातील शेतकºयांनी गुरुवारी विमा भरणा केंद्रावर रात्र जागून काढली.
ल्लपाथरी, मानवतमध्ये शेतकºयांच्या रांगा
पाथरी- पीक विमा भरण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक राहिल्याने बँकांमध्ये शेतकºयांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली. याच काळात बँकेतील इंटरनेट सेवेचा बोजवारा उडाल्याने शेतकºयांची मोठी तारांबळ झाली.
यामुळे बँक परिसर गजबजून गेला होता. जिल्हा बँकेला तर अक्षरश: यात्रेचे स्वरुप आले होते. पीक विमा भरण्यासाठी आॅफलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात करण्यात आल्यापासून आणखीच गर्दी वाढली. गत वर्षी पाथरी तालुक्यात ३७ हजार शेतकºयांनी वेगवेगळ्या बँकांत ८० लाख रुपयांचा विमा भरला होता. यावर्षी विमा भरण्यास सुरुवात झाल्यानंतर जवळपास २ ते ३ हजार शेतकºयांचा विमा महा ई-सेवा केंद्रावर भरला गेल्याचे समजते.

Web Title: vaimaa-bharataanaa-saetakarai-maetaakautailaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.