वैजापुरात सासऱ्याने केला सुनेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:03 IST2021-06-17T04:03:26+5:302021-06-17T04:03:26+5:30

सदर २९ वर्षीय महिलेेचा २०१० साली मुरारी पार्क भागातील एकाशी विवाह झाला. लग्नानंतर सासरच्या मंडळींनी महिलेचा शारीरिक व मानसिक ...

In Vaijapur, father-in-law molested Sune | वैजापुरात सासऱ्याने केला सुनेचा विनयभंग

वैजापुरात सासऱ्याने केला सुनेचा विनयभंग

सदर २९ वर्षीय महिलेेचा २०१० साली मुरारी पार्क भागातील एकाशी विवाह झाला. लग्नानंतर सासरच्या मंडळींनी महिलेचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. माहेरावरून पाच लाख रुपये घेऊन येण्यासाठी तिला त्रास दिला जात होता. दरम्यान, माहेरच्या मंडळीकडून एक लाख रुपये त्यांना देण्यात आले. मात्र, उर्वरित पैशासाठी तिचा छळ सुरूच होता. या कारणावरून एक नणंद तिच्या अंगावर थुंकली होती. तसेच दीर तिच्याकडे वाईट नजरेने पाहत होता. तिच्या रूमचा वीज पुरवठा बंद करण्यात आला. तसेच सासरा तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी करत असे. नेहमी होणाऱ्या त्रासाला कंटाळून महिलेने पोलीस ठाणे गाठून चार जणांविरोधात फिर्याद दिली. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात बेकायदेशीररीत्या घरात घुसने, पैशासाठी शारीरिक व मानसिक छळ करणे, जीवे मारण्याची धमकी देणे व विनयभंग करणे या कलमांन्वये सासरच्या चार जणांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक केळे करीत आहेत.

Web Title: In Vaijapur, father-in-law molested Sune