‘वैद्यनाथ’ चा आज होणार फैसला

By Admin | Updated: April 28, 2015 00:31 IST2015-04-28T00:08:52+5:302015-04-28T00:31:01+5:30

परळी: आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी, कार्यकर्त्यांतील हाणामारी, पालकमंत्री पंकजा मुंडे व विरोधी पक्षनेते धनंजय मुुंडे यांच्यातील वाक्युद्ध यामुळे वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना निवडणूक लक्षवेधी ठरली

Vaidyanath to be decided today | ‘वैद्यनाथ’ चा आज होणार फैसला

‘वैद्यनाथ’ चा आज होणार फैसला


परळी: आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी, कार्यकर्त्यांतील हाणामारी, पालकमंत्री पंकजा मुंडे व विरोधी पक्षनेते धनंजय मुुंडे यांच्यातील वाक्युद्ध यामुळे वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना निवडणूक लक्षवेधी ठरली. मतांचा पेटारा मंगळवारी खुला होणार असून कारखान्याची सूत्रे बहिणीच्या हाती कायम राहतात की भावाच्या पॅनलला संधी मिळते? हे पाहणे औत्सुक्याचे ठरत आहे.
कारखाना संचालकपदांच्या २० जागांसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. ८ हजार ४०९ पैकी ६ हजार ९२३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. भाजपा, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत ‘फ्रीस्टाईल’ हाणामारी झाल्याने मतदानास गालबोट लागले. तद्नंतर पालकमंत्री पंकजा मुंडे व विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे समोरासमोर आले होते.
दरम्यान, मंगळवारी सकाळी ९ वाजेपासून तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरुवात होईल. एकूण १० टेबलवर मतमोजणी पार पडणार आहे. प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक, दोन सहायक राहतील.पांगरी, नाथ्रा, परळी, सिरसाळा, धर्मापुरी अशी गटनिहाय मतमोजणी होणार आहे. रात्रीपर्यंत चित्र स्पष्ट होईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी महेंद्र कांबळे म्हणाले. (वार्ताहर)

Web Title: Vaidyanath to be decided today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.