लसची महिनाभरासाठी चिंता मिटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:02 IST2021-08-23T04:02:11+5:302021-08-23T04:02:11+5:30

औरंगाबाद : कोरोना प्रतिबंध लस घेण्यासाठी शहरात सर्वसामान्य नागरिक आरोग्य केंद्रांवर गर्दी करीत आहेत. मात्र, शासनाकडून मुबलक प्रमाणात साठा ...

The vaccine relieved anxiety for a month | लसची महिनाभरासाठी चिंता मिटली

लसची महिनाभरासाठी चिंता मिटली

औरंगाबाद : कोरोना प्रतिबंध लस घेण्यासाठी शहरात सर्वसामान्य नागरिक आरोग्य केंद्रांवर गर्दी करीत आहेत. मात्र, शासनाकडून मुबलक प्रमाणात साठा मिळत नसल्याने नागरिकांना पहिल्या, दुसऱ्या डोससाठी प्रतीक्षा करावी लागत होती. आता पुढील महिनाभर तरी जिल्ह्याला लसची टंचाई जाणवणार नाही. बजाज कंपनी काॅर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अंतर्गंत २ लाख ३० हजार डोस उपलब्ध करून देत आहे. याशिवाय शासनाकडून दर आठवड्याला २० ते २५ हजार डोस मिळणार आहेत.

१६ जानेवारी २०२१ ते ऑगस्ट या सात महिन्यांत शहर व ग्रामीण भागात पहिला डोस घेणाऱ्यांची टक्केवारी ३०.१९ एवढी आहे. दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांचा टक्का १०.९४ एवढा आहे. जिल्ह्यात लसीकरणाचे उद्दिष्ट ३२ लाख ८७ हजार ८४ एवढे निश्चित झाले आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ७० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र, शासनाकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळायला तयार नाही. आठवड्यातून चार ते पाच दिवस लस नसल्याने आरोग्य यंत्रणेला मोहीम बंद ठेवावी लागते. बजाज समूहाने सीएआरमधून शहराला १ लाख १५ हजार, तर ग्रामीणलाही १ लाख १५ हजार डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी हा साठा प्राप्त होण्याची शक्यता महापालिकेच्या आरोग्य विभागाने वर्तविली आहे.

Web Title: The vaccine relieved anxiety for a month