शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद विभागात ५० टक्के बालकांना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 22:55 IST

गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेने २० दिवसांतच ५० टक्क्यांचा पल्ला गाठला आहे. आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत औरंगाबाद विभागातील चार जिल्ह्यांत १२ लाख १७ हजार ७२६ बालकांना लसीकरण झाले आहे. २६ लाख बालकांचे उद्दिष्ट असलेल्या औरंगाबाद विभागात या मोहिमेत २३ लाखांहून अधिक उद्दिष्ट महिनाअखेरीस गाठले जाईल, असे आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे यांनी सांगितले.

ठळक मुद्देगोवर-रुबेला : पोलिओनंतर सर्वात मोठी लसीकरण मोहीम

औरंगाबाद : गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेने २० दिवसांतच ५० टक्क्यांचा पल्ला गाठला आहे. आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत औरंगाबाद विभागातील चार जिल्ह्यांत १२ लाख १७ हजार ७२६ बालकांना लसीकरण झाले आहे. २६ लाख बालकांचे उद्दिष्ट असलेल्या औरंगाबाद विभागात या मोहिमेत २३ लाखांहून अधिक उद्दिष्ट महिनाअखेरीस गाठले जाईल, असे आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे यांनी सांगितले.आरोग्य विभागाकडून २७ नोव्हेंबरपासून ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील बालकांना शासकीय, खासगी शाळा, अंगणवाडी आणि शासकीय रुग्णालयांत गोवर-रुबेला लसीकरण केले जात आहे. भारतात गोवरमुळे दरवर्षी ५० हजार बालकांना जीव गमवावा लागतो, तर रुबेला विषाणूमुळे वारंवार गर्भपात, मेलेले मूल जन्माला येतात. १ लाख मुलांत १५० मुले गतिमंद अथवा आजारांना बळी पडतात. ९० टक्के मुलांना गोवरची बाधा होते. यामध्ये ताप येतो, अंगावर पुरळ उठतात. साधारण ८ दिवसांत गोवर बरा होतो; परंतु अनेक महिने पुरळाचे डाग शरीरावर दिसतात.चार जिल्ह्यांत लसीकरणलसीकरण मोहिमेत जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, महानगरपालिका आरोग्य विभाग आणि जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत बालकांना लसीकरण केले जात आहे. आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत आतापर्यंत १२ लाखांपेक्षा अधिक बालकांचे लसीकरण झाल्याची माहिती डॉ. लाळे यांनी दिली.

टॅग्स :Healthआरोग्यSchoolशाळाStudentविद्यार्थी