बसस्थानकातील समस्या सुटता सुटेनात

By Admin | Updated: June 3, 2014 00:46 IST2014-06-02T23:53:32+5:302014-06-03T00:46:23+5:30

नळदुर्ग : नळदुर्ग बसस्थानकाचा एकीकडे ६६ वा वर्धापन दिन साजरा करत असतानाच दुसरीकडे स्थानकात असलेल्या समस्या मात्र वाढत असल्याचे दिसत आहे.

Vacancy in bus station fixes | बसस्थानकातील समस्या सुटता सुटेनात

बसस्थानकातील समस्या सुटता सुटेनात

नळदुर्ग : नळदुर्ग बसस्थानकाचा एकीकडे ६६ वा वर्धापन दिन साजरा करत असतानाच दुसरीकडे स्थानकात असलेल्या समस्या मात्र वाढत असल्याचे दिसत आहे. सद्यस्थितीत स्थानकावर जागेचा अभाव, पिण्याचे पाणी, स्वच्छता आदी समस्या प्रकर्षाने जाणवत आहेत. या बसस्थानकातून दररोज ३०० बसगाड्यांची ये-जा होते. तसेच परिसरातील ६७ खेड्यातून ५०० प्रवाशांचा बसस्थानकाशी संपर्क येतो. बसस्थानकाची उपलब्ध असलेली जागा अत्यंत अपुरी असल्यामुळे रा. प. महामंडळाने जवळपास एक वर्षापूर्वी नवीन जागेत बसस्थानक बांधकामाचा ठेका दिला आहे. परंतु, हे कामही अद्याप अर्धवट अवस्थेत दिसून येत आहे. त्यामुळे अपुर्‍या जागेमुळे प्रवाशांची फरफट होत आहे. बसस्थानकाच्या भिंतीवर कुठेही येणार्‍या-जाणार्‍या गाड्यांचे वेळापत्रक दिसून येत नाही. त्यामुळे प्रवाशांना प्रत्येक बसची चौकशी करण्यासाठी चौकशी कक्षाकडेच जावे लागत आहे. स्थानकात सध्या असलेली विजेची व्यवस्था अत्यंत तोकडी आहे. शिवाय येथे पंख्यांचाही अभाव दिसून येतो. अगोदरच जागा अपुरी, त्यातही पंखे नसल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात प्रवाशांना भर उन्हा थांबूनच बसची वाट पहावी लागत असल्याचे चित्र आहे. स्थानकात प्रवाशांना पिण्यासाठी शुध्द पाणीही मिळू शकत नसल्याचे दिसते. आवारात असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीची वेळोवेळी स्वच्छता होत नसल्याने प्रचंड दुरवस्था झाली आहे. स्थानकावरील कॅन्टीनही बंद असल्याने प्रवाशांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या स्थानकावर दोन वाहतूक नियंत्रक कार्यरत असून, रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत बसस्थानकात कुणीही राहत नाही. त्यामुळे प्रवाशांना रात्रीच्या वेळी कसलीही सुरक्षा नाही. बसस्थानकात खाजगी वाहनेही बिनदिक्कतपणे फिरत असल्याने प्रवाशांना तसेच बसगाड्यांना याचा त्रास सहन करावा लागतो. शिवाय, मोकाट कुत्री, डुकरे यांचाही वावर दिसून येतो. शहरातील वर्दळीचे सार्वजनिक ठिकाण म्हणून या बसस्थानकाकडे पाहिले जाते. त्यामुळे रोडरोमियोसह तळीरामांचाही स्थानकात नेहमीच राबता दिसून येतो. दरम्यान, स्थानकातील या समस्यांबाबत वाहतूक नियंत्रक महेश डुकरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, नवीन इमारत झाल्यानंतर प्रवाशांना सर्व सोयी-सुविधा पुरविल्या जाणार आहेत. (वार्ताहर)

Web Title: Vacancy in bus station fixes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.