महाराष्ट्राविरुद्ध उत्तर प्रदेशच्या ३५४ धावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 22:51 IST2018-01-20T22:51:21+5:302018-01-20T22:51:45+5:30
प्रथम मिश्राचे शतक आणि अंश यादव व समीर रिझवी यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर उत्तर प्रदेश संघाने महाराष्ट्राविरुद्ध शनिवारी ८ बाद ३५४ धावा फटकावल्या.

महाराष्ट्राविरुद्ध उत्तर प्रदेशच्या ३५४ धावा
औरंगाबाद : प्रथम मिश्राचे शतक आणि अंश यादव व समीर रिझवी यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर उत्तर प्रदेश संघाने महाराष्ट्राविरुद्ध शनिवारी ८ बाद ३५४ धावा फटकावल्या. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाºया उस्मानाबादच्या राजवर्धन हंगरगेकर याने घेतलेले ५ बळी हेदेखील पहिल्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले.
पुणे येथील डेक्कन जिमखाना मैदानावर आजपासून सुरू झालेल्या १६ वर्षांखालील विजय मर्चंट करंडक क्रिकेट स्पर्धेत मध्यप्रदेशकडून प्रथम मिश्रा याने १४० चेंडूंत १३ चौकार व ३ षटकारांसह ११४ धावांची खेळी सजवली. दिवसअखेर अंश यादव १९० चेंडूंत ८ चौकारांसह ८२ धावांवर खेळत आहे. प्रथम मिश्रा आणि अंश यादव यांनी सातव्या गड्यासाठी १७८ धावांची भागीदारी करताना उत्तर प्रदेशला भक्कम धावसंख्या उभारून देण्यात महत्त्वाचे योगदान दिले. या दोघांशिवाय कर्णधार समीर रिझवी याने ६१ चेंडूंत ९ चौकारांसह ५०, सुमित राठोडने ७ चौकारांसह ४७ धावा केल्या. महाराष्ट्राकडून उस्मानाबादच्या राजवर्धन हंगरगेकर याने ७३ धावांत ५ गडी बाद केले. त्याला अनिकेत इंद्रजित, अनिकेत नलावडे व विकी ओस्तवाल यांनी प्रत्येकी १ गडी बाद करीत साथ दिली.
संक्षिप्त धावफलक
उत्तर प्रदेश : (पहिला डाव) ८ बाद ३५४. (प्रथम मिश्रा ११४, अंश यादव खेळत आहे ८०, समीर रिझवी ५०, सुमित राठोड ४७. राजवर्धन हंगरगेकर ५/७३, अनिकेत इंद्रजित १/५६, अनिकेत नलावडे १/८४, विकी ओस्तवाल १/४९).