शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

एमजीएम कॅम्पसमधील आकांक्षा देशमुख खून प्रकरणात उत्तर प्रदेशचा मजूर अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 06:57 IST

या आरोपीला मुंबईला रेल्वेने पळून जात असताना कटनी रेल्वे स्टेशन ते जबलपूर दरम्यान ताब्यात घेतले.

औरंगाबाद : एमजीएमच्या गंगा वसतिगृहातील आकांक्षा देशमुख खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात मूळ उत्तर प्रदेशच्या दुधनी येथील एका मजुराला अटक केली आहे.

राहुल शर्मा असे आरोपीचे नाव असून तो 10 डिसेंबरच्या रात्री 9.30 वाजताच वसतिगृहाच्या छतावर जाऊन लपला होता. ऱात्री साडेबारा वाजेच्या सुमारास आकांशाच्या खोलीत चोरीच्या उद्देशाने शिरला. यावेळी त्याची आकांक्षासोबत झटापट झाली,तिची सोनसोखळी चोरत त्याने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. मात्र,आकांक्षाला मासिक पाळी असल्याने त्याने तिचा तोंड व गळा दाबून खून केला. नंतर रात्री 3 वाजता वस्तीगृहातून निघून सीसीटीव्हीपासून लपत आडमार्गाने परिसराबाहेर पडला.

रात्री अचानक नऊ वाजता रूम वरून गेलेला शर्मा त्याच्या रूमवर 3च्या नंतर पोहनचला. लागलीच त्याने चार मजुरांना सोबत घेत उत्तर प्रदेशात गावाकडे आईला भेटण्यासाठी जात असल्याचे रूममधील सोबत्यांना सांगितले. यावरून पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला होता.

ओळख लपविण्याचा प्रयत्न

औरंगाबादमधून बाहेर पडल्यास गावी गेल्यानंतर दाढी डोक्याचे केस कापत रुप बदले. तसेच तो नेेहमी सारख बस ने न जाता यावेळी रेल्वेने गेला. या दरम्यान,पोलिसांनी सर्व मजुरांची यादी करून तपास सुरू केला होता.पोलिसांनी उत्तर प्रदेश गाठून शर्माला दुधनी येथून मुंबईला रेल्वेने पळून जात असताना कटनी रेल्वे स्टेशन ते जबलपूर दरम्यान ताब्यात घेतले.

गुन्ह्याची दिली कबुली

घटनेच्या आधी सात दिवसांपासून शर्मा आकांक्षाच्या रुम समोरच काम करत असे. यामुळे त्याला तिच्याबद्दल माहिती होती. यावरूनच चोरी आणि बलात्काराच्या उद्देशाने त्याने तिचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. ही कारवाई पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनखाली फौजदार सी बी ठुबे कर्मचारी संतोष मुदीराज आणि इरफान खान यांनी केली.

काय आहे प्रकरण :

एमजीएममधील गंगा वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावरील रूम नंबर ३३४ मध्ये राहणाऱ्या डॉ. आकांक्षा अनिल देशमुख (रा. माजलगाव) या विद्यार्थिनीचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे ११ डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आले. याविषयी सिडको ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला. आकांक्षा मृतावस्थेत  सुमारे १५ ते १८ तास रूममध्ये पडून होती. १० डिसेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास आक ांक्षाला वसतिगृहातील मुलींनी पाहिले होते. शिवाय ती सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. त्यानंतर ती तिच्या खोलीत गेली आणि ११ डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास मृतावस्थेत आढळली होती. तिच्या खोलीतील दोन पलंग जागेवरून सरकलेले होते, तर टेबल उलटा पडलेला होता. रूमध्ये मिठाची डबी, पांढऱ्या रंगाचा स्कार्प पडलेला होता. शवविच्छेदन अहवालात आकांक्षाचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले, तेव्हापासून पोलिसांनी आकांक्षाच्या मारेकऱ्यांचा कसून तपास सुरू केला होता.