शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
5
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
6
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
8
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
9
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
10
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
11
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
12
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
13
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
14
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
15
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
16
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
17
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
18
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
19
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
20
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल

अधिसभा, विद्या परिषदेवर ‘उत्कर्ष’चे वर्चस्व; चुरसीच्या लढाईत दिग्गजांचा पराभव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 17:26 IST

विद्यापीठ विकास मंचचा प्रत्येक गटात एक विजय, काही जागांवर काट्याची टक्कर

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत उत्कर्ष पॅनलने बाजी मारून पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले. विद्यापीठ विकास मंचचा प्रत्येक गटात एक सदस्य निवडून आला. परिवर्तन आणि स्वाभिमानी पॅनलनेही एक-एक जागा जिंकत खाते उघडले. अनेक जुन्या आणि दिग्गजांना पराभवाला सामोरे जावे लागले.

मंगळवारी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू झाली. प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, सचिव भगवान साखळे, निवडणूक समितीचे अध्यक्ष कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड व सदस्य उपस्थित होते. प्राचार्य गटात खुल्या प्रवर्गातून डॉ. बाबासाहेब गोरे (१५ मते), डॉ. भारत खंदारे (१४), डॉ. विश्वास कंधारे व डॉ. संजय लिंबराज कोरेकर हे १३ मतांचा कोटा पूर्ण करून विजयी झाले. डॉ. दादा शेंगुळे हे ९ मते घेऊन (बिलो कोटा) विजयी घोषित झाले. प्राचार्य मागास प्रवर्गातून डॉ. गौतम पाटील (अनुसूचित जाती प्रवर्ग-४६ मते), डॉ. गोवर्धन सानप (व्हीजेएनटी - ५२ मते), डॉ. हरिदास विधाते (इतर मागास प्रवर्ग- ५० मते) हे विजयी झाले. डॉ. शिवदास सिरसाठ बिनविरोध आले असून, महिला गटातील जागा रिक्त आहे. विद्यापीठ शिक्षक गटातून डॉ. भास्कर साठे (खुला प्रवर्ग ६० मते), डॉ. वैशाली खापर्डे (महिला ६९ मते), डॉ. चंद्रकांत नामदेवराव कोकाटे (अनुसूचित जमाती ६५ मते) हे निवडून आले.

संस्थाचालक गटात खुल्या प्रवर्गातून बसवराज मंगरुळे (३५ मते), डॉ. मेहर पाथ्रीकर (३३ मते), हे कोटा पूर्ण करून विजयी झाले. गोविंद देशमुख (३२ मते) व अशिलेष मोरे हे ’बिलो काटो’ (२८ मते) विजयी घोषित करण्यात आले. संस्थाचालक महिला प्रवर्गातून अर्चना चव्हाण (अर्चना रमेश आडसकर) व नितीन जाधव (अनुसूचित जाती प्रवर्ग) हे दोघे जण आधीच बिनविरोध निवडून आले आहेत.

संजय निंबाळकर, सतीश दांडगे पराभूतसन १९७४, १९९४ आणि २०१६ या तिन्ही वेळच्या विद्यापीठ कायद्याच्या कार्यकाळात काम करणारे संजय निंबाळकर यांचा संस्थाचालक गटातून पराभव झाला. बरोबरीची मते मिळाली, मात्र अश्लेष मोरे यांनी प्रथम पसंतीची अधिक मते मिळवित विजय मिळविला. विद्यापीठ शिक्षक गटातून सतीश दांडगे तिसऱ्यांदा निवडून येण्यात अपयशी ठरले. तर विद्यापीठ शिक्षक गटातून भास्कर साठे, चंद्रकांत कोकाटे आणि वैशाली खापर्डे हे सदस्य पहिल्यांदा निवडून आले. परिवर्तन पॅनलचे विलास खंदारे पराभूत झाले. मात्र त्यांच्या पॅनलमधील उमाकांत राठोड हे निवडून आले. त्यामुळे ‘गड गेला, पण गडी आला’ अशी चर्चा सुरू होती.

अधिसभा गट, प्रवर्गनिहाय जागा , उमेदवार व मिळालेली मते.प्राचार्य - १० जागा (५ खुला प्रवर्ग, ५ राखीव)

विजयी उमेदवार :डॉ. बाबासाहेब गोरे - १५डॉ. विश्चास कंधारे - १३डॉ. भारत खंदारे- १४डॉ. संजय कोरेकर - १३डॉ. दादा शेंगुळे -९

पराभूत उमेदवारडॉ. गणेश अग्निहोत्री - ८ मतेडॉ. दत्तात्रय वाघ ४डॉ. राजकुमार मस्के -१

अनुसूचित जमाती प्रवर्गडॉ. शिवदास शिरसाठ - बिनविरोध

अनुसूचित जाती प्रवर्गडॉ. गौतम पाटील (विजयी)- ४६डॉ. राजकुमार मस्के - ३१

भटके विमुक्त जाती-जमाती प्रवर्गडॉ. गोवर्धन सानप (विजयी)- ५२डॉ. राजेंद्र परदेशी - २१

इतर मागास प्रवर्गडॉ. हरिदास विधाते (विजयी)- ५०डॉ. शहाजहान मनेर- २४

महिला प्रवर्ग - रिक्तविद्यापीठ शिक्षक - ३ जागा

खुला प्रवर्ग-डॉ. भास्कर साठे (विजयी)- ६०डॉ. सतीश दांडगे- ३३डॉ. संजय साळुंके - ४२डॉ. अशोक पवार-१

अनुसूचित जाती प्रवर्गडॉ. चंद्रकांत कोकाटे (विजयी)-६५मतेडॉ. गोपीचंद धरणे - ४२,डॉ. भगवान गव्हाडे-१५

महिला प्रवर्ग -डॉ. वैशाली खापर्डे (विजयी) - ६९ मतेडॉ. फराह गौरी नाझ- ५२

संस्थाचालक- ४ जागाविजयी उमेदवार -बसवराज मंगरुळे-३५डॉ. मेहेर पाथ्रीकर- ३३गोविंद देशमुख-३२अश्लेष मोरे-२८पराभूत -संजय निंबाळकर-२८ मतेविनायक चोथे-१५,किशोर हंबर्डे-१७

महाविद्यालयीन शिक्षक गटमहिला : डाॅ. कल्पना हनुमंतराव घार्गे (१०३५)एससी : डाॅ. संजय कांबळे ( १०५६)एसटी : डाॅ. सतीश गावित (१२८०)ओबीसी : रविकिरण सावंत (९९४)व्हीजेएनटी : उमाकांत राठोड (९६०)

विद्या परिषदेचा निकालमानव्य विद्या शाखा :खुला गट - डॉ. राजेश करपे (१ हजार ४८४ मते)व्हीजेएनटी प्रवर्ग : डॉ. व्यंकटेश लांब (१ हजार २५२ मते)विज्ञान विद्या शाखा :महिला प्रवर्ग - डॉ. रेखा गुळवे (१ हजार २७८ मते)अनुसूचित जाती प्रवर्ग : डॉ. वैभव मुरुमकर (१ हजार २२७ मते)वाणिज्य विद्या शाखा :डॉ. राजेश लहाने (१ हजार २९२ मते)आंतरविद्या शाखा : खुला प्रवर्ग.डॉ. प्रभाकर लहूराव कराड (१ हजार १८२ मते)

३ महिन्यांपासून मेहनतविद्यापीठ प्रशासन, कुलसचिव, निवडणूक समिती, निवडणूक विभाग आदींनी गेल्या ३ महिन्यांपासून मेहनत घेतली. सर्व प्रक्रिया नियोजनबद्ध, पारदर्शक आणि शांततेत पार पडली.- डाॅ. प्रमोद येवले, कुलगुरू

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबाद