उत्साह पोलिसांचा अन् डोकेदुखी अन्न प्रशासनाची !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 00:56 IST2017-07-29T00:56:33+5:302017-07-29T00:56:33+5:30
बीड : जिल्ह्यात गुटख्यावर पोलिसांकडून कारवाई केली जाते. परंतु ही कारवाई करताना पोलिसांकडून दाखवला जाणारा उत्साह आता अन्न प्रशासनाची डोकेदुखी ठरू लागला आहे.

उत्साह पोलिसांचा अन् डोकेदुखी अन्न प्रशासनाची !
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात गुटख्यावर पोलिसांकडून कारवाई केली जाते. परंतु ही कारवाई करताना पोलिसांकडून दाखवला जाणारा उत्साह आता अन्न प्रशासनाची डोकेदुखी ठरू लागला आहे. गुटखा पकडल्यानंतर पोलिसांनी अन्न प्रशासन विभागाच्या अधिकाºयांच्या उपस्थितीत जप्तीची कारवाई करणे गरजेचे असते. परंतु पोलीस तसे करीत नाहीत. न्यायालयाच्या नियमानुसार पोलिसांनी केवळ सहकार्याची भूमिका बजवावी. त्यांना गुटखा जप्त किंवा त्यावर कारवाईचे अधिकार नसल्याचे अन्न प्रशासनाचे सहायक आयुक्त अभिमन्यू केरूरे यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका वाहनात गुटखा पकडला होता. मात्र अन्न प्रशासन विभागाचे अधिकारी पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी गुटखा बाहेर काढून त्याचे फोटो काढले. माहितीनुसार पोलिसांची ही कृतीच कायद्याचा भंग करणारी आहे. नवीन अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार प्रतिबंधित अन्न पदार्थ जप्तीचे अधिकार अन्न प्रशासनाला आहेत. त्यामुळे जप्तीची कारवाई पूर्ण होण्यापूर्वी वाहनातून गुटखा बाहेर काढणे अपेक्षित नव्हते. पोलिसांच्या या कृतीमुळे गुटखा नेमका वाहनातच पकडला की इतरत्र कोठे पकडून वाहनात दाखवण्यात आला? हा देखील प्रश्न निर्माण होत आहे. नेकनूरच्या कारवाईत बाहेर काढलेला गुटखा हा जप्त केलेल्या वाहनात बसत नसल्याचा संशय खुद्द अन्न प्रशासनाच्या अधिकाºयांनी व्यक्त केला होता. त्यामुळे पोलीस संशयाच्या पिंजºयात अडकले आहेत.