उस्मानाबाद, वाशी हादरले
By Admin | Updated: January 5, 2016 00:07 IST2016-01-04T23:38:47+5:302016-01-05T00:07:57+5:30
उस्मानाबाद : उस्मानाबाद, वाशी तालुका व परिसरात सोमवारी सकाळी ११़५५ वाजण्याच्या सुमारास गूढ आवाज झाला़ उस्मानाबाद शहर व परिसरात

उस्मानाबाद, वाशी हादरले
उस्मानाबाद : उस्मानाबाद, वाशी तालुका व परिसरात सोमवारी सकाळी ११़५५ वाजण्याच्या सुमारास गूढ आवाज झाला़ उस्मानाबाद शहर व परिसरात यापूर्वी झालेल्या आवाजापेक्षा सोमवारी झालेल्या आवाजाची तीव्रता अधिक होती़ जिल्ह्याच्या विविध भागात वेळोवेळी गूढ आवाज होत असल्याने सर्वत्र दहशत पसरली असून, या घटनेकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे़
उस्मानाबाद शहरासह तालुक्यातील ढोकी, तेर, तुगाव, रूई, गोवर्धनवाडी, कावळेवाडी, कनगरा, धुत्ता, टाकळी, नांदुर्गा, शिवाजीनगर परिसरात सकाळी ११़५५ वाजण्याच्या सुमारास हा आवाज झाला़ तर वाशी शहरासह तालुक्यातील समरमकुंडी व परिसरातही सौम्य स्वरूपाचा आवाज झाला़ जिल्ह्यात विशेषत: उस्मानाबाद, भूम, वाशी परिसरात असे गूढ आवाज वेळोवेळी जाणवत असून, प्रशासनाच्या पथकामार्फत याची पाहणीही करण्यात आली. मात्र, या आवाजामागील गुढ मात्र अद्यापही कायम आहे. (प्रतिनिधी)