दुसऱ्याच्या नावावरील ‘सीम’चा वापर
By Admin | Updated: February 6, 2015 00:55 IST2015-02-06T00:52:13+5:302015-02-06T00:55:42+5:30
तुळजापूर : दुसऱ्याच्या नावे खोटी कागदपत्रे दाखल करून त्यांच्या नावावरील मोबाईल सीमकार्डचा वापर करणाऱ्या सहा जणांविरूध्द येथील पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल

दुसऱ्याच्या नावावरील ‘सीम’चा वापर
तुळजापूर : दुसऱ्याच्या नावे खोटी कागदपत्रे दाखल करून त्यांच्या नावावरील मोबाईल सीमकार्डचा वापर करणाऱ्या सहा जणांविरूध्द येथील पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरासह परिसरात काम करणाऱ्या परगावच्या व्यक्ती दुसऱ्याच्या नावे मोबाईल सीमकार्ड वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून पोलिसांनी देवराज श्रीकृष्ण चंदशर्मा (वय २०, रा. कोलकत्ता), अनिल देवराज शर्मा (वय २०, रा. सुनेतर), कौशल्य श्रीभीषणदास गुप्ता (वय २१, रा. टेरणी, जि. उधमपूर, ह.मु. तुळजापूर), असलाराम नारायणराम चौधरी (वय ३२, रा. तामसूर, जि. जोधपूर, राजस्थान, ह.मु. तुळजापूर), मिरल मनसुकभाई हिंगराजीया (वय २०, रा. रामकृष्णनगर, जि. जामनगर, गुजरात) व पांडुरंग विठ्ठलराव वाघमारे (वय २१, रा. परळी, हल्ली दोघेही रा. हुडको, तुळजापूर) या सर्वांना अटक केली. चौकशीअंती त्यांच्याविरुध्द भादंवि कलम ४२०, ४१७, ४७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोहेकॉ एम. आर. दळवी व आर एम. आडसूळ करीत आहेत. (वार्ताहर)