शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Morcha Update Live: सरकारचा दगाफटका करायचा डाव असेल तर मोठी चूक; रोहित पवारांचा इशारा
2
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
3
उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ढगफुटीची; ढिगाऱ्यामुळे काही क्षणात अनेक लोक बेपत्ता; बचावकार्य सुरू
4
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
5
Ganesh Visarjan: दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप! मुंबईत दुसऱ्या दिवशी ५९,४०७ गणपती मूर्तींचे विसर्जन
6
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
7
गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक
8
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
9
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
10
मोदींच्या आईबद्दल अवमानकारक भाषा, काँग्रेस बनला शिवीगाळ करणारा पक्ष; भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांची खरमरीत टीका
11
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
12
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
13
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
14
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
15
अमेरिकने कितीही दम दिला, तरी उत्पादनात भारताची झेप
16
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
17
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
18
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
19
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास

MPSC मुख्य परीक्षेत ब्लूटूथ इयरफोनचा वापर; तरुणाविरोधात गुन्हा दाखल

By योगेश पायघन | Updated: January 21, 2023 17:33 IST

ज्यसेवा मुख्य परीक्षा -२०२२ चा पहिला पेपर आज सकाळी ९ वाजता होता. यावेळी उघडकीस आला प्रकार

औरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा -२०२२ मध्ये मौलाना आझाद काॅलेजच्या परीक्षा केंद्रावर सकाळी पहिला पेपर सुरू असतांना उमेदवाराकडे ब्लूटूथ इयरफोन आढळून आला. त्या उमेदवाराविरोधात केंद्रप्रमुखाच्या तक्रारीवरून सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

प्रा. डाॅ. सय्यद अथरोद्दीन मैनोद्दीन कादरी हे मौलाना आझाद कॉलेजच्या एमपीएससी परीक्षेचे केंद्रप्रमुख आहेत. राज्यसेवा मुख्य परीक्षा -२०२२ चा पहिला पेपर आज सकाळी ९ वाजता होता. त्यासाठी विद्यार्थ्यांना फ्रिस्क्रिन एजन्सीने तपासुन परीक्षा केंद्रात सोडले. मोबाईल फोनसह अन्य दुरसंचार साधने परीक्षा केंद्रात घेवून जाणे, बाळगणे मनाई आहे. सर्व हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. 

दरम्यान, परीक्षेला सुरूवात झाल्यानंतर १०.५० वाजता. केंद्रप्रमुख  प्रा. डाॅ. सय्यद कादरी व जिल्हाधिकारी कार्यालयाचे निरीक्षक रूपेश शिंगारे हे खोली क्रमांक ४ मध्ये राऊंड घेत होते. त्यावेळी सचिन नवनाथ बागलाने या उमेदवाराकडे ब्ल्यू टूथ इअरफोन असल्याचे पथकाला आढळून आले. या गैरप्रकाराची एमपीएससीने गंभीर दखल घेतली. परीक्षेदरम्यान ब्लूटूथचा वापर करणाऱ्या उमेदवाराविरुद्ध गैरप्रकारास प्रतिबंध अधिनीयम १९८२ अन्वये कलम ७ अन्वये सिटीचौक पोलिस ठाण्यात केंद्र प्रमुखांनी तक्रार दिली.

३७ उमेदवारांची गैरहजेरीराज्य सेवा मुख्य परीक्षा-२०२२ शहरात ४ केंद्रांवर २१ ते २३ जानेवारीदरम्यान आयोजित करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी ९ ते १२, दुपारी ४ ते ५ शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयात ४३२ पैकी ४२०, मौलाना आझाद महाविद्यालयात २८८ पैकी २७५, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य महाविद्यालयात २४० पैकी २३६ तर मिलिंद कला महाविद्यालयात २२२ पैकी २१४ उमेदवारांची उपस्थिती होती. ११८२ पैकी ११४५ उमेदवारांनी परीक्षा दिली. तर ३७ विद्यार्थ्यांची गैरहजेरी होती.

ट्विटर हॅण्डलवरून दिली माहीतीराज्य सेवा मुख्य परीक्षा २०२२ करिता औरंगाबाद येथे परीक्षेच्या वेळी ब्लू टूथ जवळ बाळगल्याबद्दल सचिन नवनाथ बागलाने या उमेदवारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहीती एमपीएससीच्या ट्विटर हॅण्डलवरूनही देण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMPSC examएमपीएससी परीक्षाAurangabadऔरंगाबाद