सर्रास धोकादायक शॉर्टकटचा वापर
By Admin | Updated: October 14, 2014 00:39 IST2014-10-14T00:08:40+5:302014-10-14T00:39:31+5:30
औरंगाबाद : मॉडेल रेल्वेस्थानकावर एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी दोन दादरे आणि लिफ्टची सुविधा आहे;

सर्रास धोकादायक शॉर्टकटचा वापर
औरंगाबाद : मॉडेल रेल्वेस्थानकावर एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी दोन दादरे आणि लिफ्टची सुविधा आहे; परंतु थोडेसे अंतर वाचविण्यासाठी जीव धोक्यात घालून अनेक प्रवासी थेट रुळावरून ये-जा करीत आहेत. हा प्रकार रोखण्याकडे रेल्वे प्रशासनाचे अद्यापही दुर्लक्ष होत आहे.
त्यामुळे दोन रुळांच्या जागेतील अंतर लोखंडी जाळी, बॅरिकेड्सने बंद करण्याची आवश्यकता आहे. शिवाय, अशा प्रकारे रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांना रोखण्याची, त्यांच्यावर योग्य कारवाईची गरज आहे. नवीन आणि जुन्या इमारतीत एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर ये-जा करण्यासाठी दादरा आहे.
याशिवाय लिफ्टची सुविधाही आहे. गेल्या काही दिवसांत रेल्वे रूळ ओलांडण्याच्या प्रयत्नात गंभीर अपघात होण्याच्या घटना समोर आल्या. त्यामुळे प्रवाशांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे.
जाळी अन् बॅरिकेड्स
स्थानकावर प्लॅटफॉर्म गाठण्यासाठी होणारे प्रकार रोखण्यासाठी दोन रेल्वे रुळांमधील जागा लोखंडी जाळी अथवा बॅरिकेड्सने बंद करण्याची आवश्यकता आहे. शिवाय, रेल्वे ये-जा करण्याच्या वेळेत हा प्रकार रोखण्यासाठी अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे.