२०० कोटी लिटर पाण्याचा मद्यनिर्मितीसाठी वापर
By Admin | Updated: May 14, 2016 00:12 IST2016-05-14T00:06:39+5:302016-05-14T00:12:58+5:30
संजय देशपांडे, औरंगाबाद मद्य व बीअरनिर्मिती करणाऱ्या दहा कारखान्यांनी २०१५-१६ या आर्थिक वर्षात तब्बल २०० कोटी लिटर पाण्याचा वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे.

२०० कोटी लिटर पाण्याचा मद्यनिर्मितीसाठी वापर
संजय देशपांडे, औरंगाबाद
मद्य व बीअरनिर्मिती करणाऱ्या दहा कारखान्यांनी २०१५-१६ या आर्थिक वर्षात तब्बल २०० कोटी लिटर पाण्याचा वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे. बीअरच्या सहा कारखान्यांनी ३१ कोटी ७ लाख १,७८१ लिटरचे, तर विदेशी मद्य तयार करणाऱ्या चार कारखान्यांनी ७ कोटी ६३ लाख १६,६१९ लिटरचे उत्पादन घेतले. २०१४-१५ या वर्षाच्या तुलनेत बीअरनिर्मितीत तीन टक्के, तर विदेशी मद्यनिर्मितीत नऊ टक्के वाढ झाली आहे.
औरंगाबादेतील बीअर व मद्यनिर्मिती करणाऱ्या उद्योगांना अवघ्या १६ रुपयांत एक हजार लिटर शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो. या क्षेत्रातील १२ उद्योगांना भर दुष्काळात दररोज ४० लाख लिटर पाण्याचा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) पुरवठा केला जात होता. लातूर शहराची दोन दिवसांची तहान भागविणाऱ्या पाण्याची या कारखान्यांकडून एकाच दिवसात नासाडी केली जात होती. ‘लोकमत’ने सात व आठ एप्रिलच्या अंकात वृत्त प्रसिद्ध करून याकडे लक्ष वेधले होते. याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिकाही दाखल झाल्या होत्या. मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या पाण्यात ६० टक्के, तर इतर उद्योगांच्या पाण्यात २५ टक्के कपात करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.
मद्याचा महापूर
मद्य व बीअरनिर्मितीसाठी कच्चामाल म्हणून पाण्याचाच वापर केला जातो.
2 न्यायालयाच्या आदेशानुसार सध्या या उद्योगांच्या पाण्यात ६० टक्के कपात करण्यात आल्याने त्यांचे उत्पादनही ६० टक्क्यांनी घटले आहे; परंतु त्यापूर्वी म्हणजे २०१५-१६ या आर्थिक वर्षात या कारखान्यांनी तब्बल २०० कोटी लिटर पाण्याचा वापर केला आहे.
3 यावर्षात औरंगाबादेत ३१ कोटी ७ लाख लिटर बीअर आणि ७ कोटी लिटर विदेशी मद्याचे उत्पादन झाले. देशी मद्याची निर्मिती करणाऱ्या दोन कारखान्यांनी ६ लाख ४१,५४८ लिटरचे उत्पादन घेतले.
4 एक लिटर बीअर व मद्यनिर्मितीसाठी सुमारे चार लिटर पाण्याची गरज असते. हे गणित विचारात घेतल्यास सुमारे ४० कोटी लिटर मद्य, बीअरसाठी २०० कोटी लिटर पाण्याचा वापर करण्यात आला.