बाभळगावच्या विलासबागेतील समाधीस्थळी उसळला जनसागर...
By Admin | Updated: May 27, 2015 00:41 IST2015-05-27T00:28:02+5:302015-05-27T00:41:09+5:30
लातूर : माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या ७० व्या जयंतीनिमित्त मंगळवारी बाभळगाव येथील विलासबागेतील त्यांच्या समाधीस्थळी

बाभळगावच्या विलासबागेतील समाधीस्थळी उसळला जनसागर...
लातूर : माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या ७० व्या जयंतीनिमित्त मंगळवारी बाभळगाव येथील विलासबागेतील त्यांच्या समाधीस्थळी देशमुख कुटुंबियांसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. यावेळी विलासरावांच्या लोकसेवेचा जीवनपट सर्वांच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. विलासरावांच्या आठवणी अनेकांना दाटून आल्या.
प्रदीर्घ राजकीय कालखंडात विलासरावांनी सामान्य माणसांचा व मागासलेल्या भागांचा विकास करण्यासाठी कार्य केले, हे कोणालाही विसरता येणार नाही. म्हणूनच आदरांजली वाहण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी उसळली होती. प्रारंभी विकास सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा वैशालीताई देशमुख यांनी विलासराव देशमुख यांच्या समाधीवर पुष्प अर्पण केले. त्यानंतर माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख, आदिती देशमुख, सिनेअभिनेता रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, गौरवी देशमुख-भोसले, अवीर, अवान, रियान, आकांक्षा, अभिजीत देशमुख, सत्यजीत देशमुख, जयसिंहराव देशमुख, नाथसिंह देशमुख, विवेक जाधव यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली.
यावेळी खा.डॉ. सुनील गायकवाड, आमदार अॅड. त्रिंबक भिसे, राज्य साक्षरता परिषदेचे अध्यक्ष अॅड. त्र्यंबकदास झंवर, माजी आ. वैजनाथ शिंदे, माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, महापौर अख्तर शेख, जि.प. अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर, माजी आ. चंद्रशेखर भोसले, ‘मांजरा’चे माजी चेअरमन धनंजय देशमुख, जगदीश बावणे, आबासाहेब पाटील, सर्जेराव मोरे, यशवंत पाटील, विजय देशमुख, संतोष देशमुख, राजेश्वर निटुरे, अॅड. व्यंकट बेद्रे, मोईज शेख, अॅड. विक्रम हिप्परकर, प्रा.बी.व्ही. मोतीपवळे, बसवराज पाटील नागराळकर, दिलीप पाटील नागराळकर, लक्ष्मीकांत कर्वा, उपमहापौर कैलास कांबळे, व्ही.बी. पाटील, प्रा. राजकुमार जाधव, नरेश पंड्या, भानुदास डोके, कल्याण पाटील, शाम देशमुख, विद्याधर कांदे-पाटील, लक्ष्मण मोरे, लालासाहेब देशमुख, लालासाहेब चव्हाण, तात्यासाहेब देशमुख, प्रताप पाटील, प्रताप पडिले, दगडूसाहेब पडिले, राजकुमार आकनगिरे, किसनराव लोमटे, माधव गंभीरे, अमर भोसले, मन्मथ किडे, रमेश राठी, रमेश देशमुख, संभाजी सूळ, राम कोंबडे, एस.डी. बोखारे, दत्ता शिंदे, डॉ.एस.एन. जटाळ, प्रदीप राठी, ललितभाई शहा, राजकुमार पाटील, सहदेव मस्के यांनी समाधीस्थळी पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. (प्रतिनिधी)
सूरमणी बाबूराव बोरगावकर व तालमणी डॉ. राम बोरगावकर यांच्या संचाने भजनसेवा दिली. संगीतमय आदरांजली बोरगावकर बंधूंनी यावेळी अर्पण केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामानुज रांदड यांनी केले. यावेळी आर.ई. सोनकांबळे, नबी नळेगावकर, संजय निलेगावकर, दौलतराव कदम, संजय जगताप, गट्टू अग्रवाल, डॉ. संजय पौळ, भैरवनाथ सूर्यवंशी, पप्पू देशमुख, गोविंद पारिख, भागवत सोट, सूर्यकांत शेळके, अॅड. श्रीरंग दाताळ, डॉ. ब्रिजमोहन झंवर, गणपतराव बाजुळगे, फक्रुद्दीन पटेल, सतीश हलवाई, राजू पाटील, श्यामराव सूर्यवंशी यांनीही आदरांजली वाहिली.
महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीतील सदस्य व मांजरा, विकास, रेणा आणि जागृती सहकारी साखर कारखान्यातील संचालक, पदाधिकारी, विविध सेवा सहकारी संस्थांचे संचालक, उद्योग, शिक्षण आदी क्षेत्रांतील मान्यवरांनी विलासरावांना आदरांजली अर्पण केली.