संदल मिरवणुकीने उरूसास प्रारंभ
By Admin | Updated: April 16, 2016 23:53 IST2016-04-16T23:46:37+5:302016-04-16T23:53:09+5:30
परंडा : येथील हजरत खाँजा बद्रोद्दीन चिश्ती शहीद रहे. अलेही यांच्या ६९६ व्या उरूसास शनिवारी सायंकाळी संदल मिरवणुकीने उत्साहात प्रारंभ झाला़ उरूसानिमित्त दर्शनासाठी जिल्ह्यासह

संदल मिरवणुकीने उरूसास प्रारंभ
धार्मिक कार्यक्रम : हजारो भाविक दाखल
परंडा : येथील हजरत खाँजा बद्रोद्दीन चिश्ती शहीद रहे. अलेही यांच्या ६९६ व्या उरूसास शनिवारी सायंकाळी संदल मिरवणुकीने उत्साहात प्रारंभ झाला़ उरूसानिमित्त दर्शनासाठी जिल्ह्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक परंडा नगरीत दाखल झाले होते़
शहरातील तहसील कार्यालयातून सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास उरूस संदलच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. प्रारंभी तहसील कार्यालयात मानाच्या चादरीला मान्यवरांच्या उपस्थितीत फातेहखाणी देवून मानाची चादर तहसीलदार स्वरूप कंकाळ यांच्या डोक्यावर देण्यात आली़ तसेच आमदार राहुल मोटे, भाजपा प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, अॅड नुरुद्दीन चौधरी यांच्या डोक्यावरही चादरी देवून खाँजा साहेब यांच्या मानाच्या घोड्यावर चादरी चढवण्यात आल्या.
यावेळी उपनगराध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल, जिल्हा परिषदेचे गटनेते दत्ता साळुंके, जाकीर सौदागर, उपसभापती मेघराज पाटील, सुभाष शिंदे, शकंर इतापे, सुखदेव टोंपे, अॅड संदिप पाटील, संजय बनसोडे, बाळासाहेब हाडोग्रीकर, भागचंद नेटके, नवनाथ जगताप, गौतम लटके, मुकुल देशमुख, अॅड संतोष सुर्यवंशी, धनजंय हांडे, वाजीद दरवनी, ईस्माईल कुरेशी, विनोद साळवे, शिवाजी मेहेर, हारून पठाण, शाम मोरे, राहुल बनसोडे, रमेशसिंह परदेशी, शब्बीरखाँ पठाण, अकील जिनेरी आदी उपस्थित होते़ या मिरवणुकीचे शेरे म्हैसूर टिपू सुलतान चौकात मंचचे संस्थापक अध्यक्ष जाकीर सौदागर यांनी स्वागत केले़
संदल मिरवणूक काळात पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. प्रारंभी सकाळी १० वाजता दर्गाहच्या कलशाची बाडीवाले यांच्या वाड्यावरून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली होती.
कलशाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती़ ‘हजरत खाँजा बद्रोद्दीन की दो चारो दीन’च्या जयघोषाने शहर दणाणून गेले होते़ (वार्ताहर)