शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गोरगरिबांच्या उपचारातून घाटी रुग्णालयात महिन्याला १.७० कोटींपर्यंत जमा, रुग्ण किती येतात?

By संतोष हिरेमठ | Updated: April 11, 2024 19:29 IST

एकूण जमा रक्कमेच्या २५ टक्के रक्कम शासनाला, तर ७५ टक्के रक्कम घाटी रुग्णालयातच खर्च

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांना आधारवड ठरणाऱ्या घाटी रुग्णालयाला उपचारापोटी महिन्याकाठी १.५० ते १.७० कोटी रुपये मिळतात. ही रक्कम रुग्णांच्या खिशातून नाही, तर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून घाटीला मिळत आहे. यातील २५ टक्के रक्कम शासनाला जाते, तर ७५ टक्के रक्कम घाटीतच खर्च केली जात आहे.

घाटीत मोफत उपचार मिळतात, हे रुग्णांना माहीत आहे. परंतु, हे मोफत उपचार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून दिले जातात. योजनेत उपचार केल्यानंतर दाव्याची रक्कम घाटीला अदा केली जाते. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी आरोग्य विमा योजना आहे. योजनेंतर्गत घाटी रुग्णालयासह निवडक आजारांवर खाजगी अंगीकृत रुग्णालयांत पात्र शिधापत्रिकाधारक व अन्य लाभार्थ्यांना नि:शुल्क वैद्यकीय सेवा पुरविण्यात येत आहेत.

घाटीत महिन्याला किती रुग्ण?मराठवाड्यासह जवळपास १२ जिल्ह्यांतील गोरगरीब रुग्णांसाठी आशेचा किरण असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात घाटी रुग्णालयात रुग्णसंख्या झपाट्याने वाढते आहे. घाटीतील ओपीडीत महिन्याकाठी सुमारे ४० हजार रुग्ण तपासले जातात.

२५ टक्के शासनालाघाटी रुग्णालयात १,१७७ खाटा आहेत. प्रत्यक्षात त्यापेक्षा अधिक रुग्ण दाखल असतात. त्यामुळे जमिनीवर गादी टाकूनही रुग्णांवर उपचार करावे लागतात. महिनाभरात ५ हजारांवर रुग्ण आंतररुग्ण विभागात (आयपीडी) दाखल होतात. या ‘आयपीडी’तील रुग्णांवर योजनेच्या माध्यमातून उपचार केले जातात. यातून महिन्याकाठी १.७० कोटी रुपयांपर्यंतची रक्कम घाटीला मिळते. यातील २५ टक्के शासनाला जाते. ७५ टक्के रक्कम ही रुग्णसेवा प्रोत्साहन भत्ता, औषधी, मनुष्यबळ इ.वर खर्च केला जातोय.

योजनेतील रुग्णसंख्या वाढविणारमहात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतील उपचारांच्या दाव्यांतून घाटीला महिन्याला जवळपास १.७० कोटींची रक्कम मिळते. ही रक्कम वाढीसाठी योजनेत उपचार होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढविण्यावर भर दिला जात आहे.- डाॅ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीhospitalहॉस्पिटल