असंघटित कामगारांचा मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 20:56 IST2019-02-28T20:56:08+5:302019-02-28T20:56:28+5:30
आयटकच्यावतीने वाळूज येथे बुधवारी आयोजित असंघटीत कामगारांच्या मेळाव्यात शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.

असंघटित कामगारांचा मेळावा
वाळूज महानगर: आयटकच्यावतीने वाळूज येथे बुधवारी आयोजित असंघटीत कामगारांच्या मेळाव्यात शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून कॉ.मधुकर खिल्लारे, भाकपचे शाखा सचिव रतन अंबिलवादे, कॉ. इब्राहिम शेख, शेख अमजद, कॉ. बाबा खॉन आदींची उपस्थिती होती. कॉ.खिल्लारे म्हणाले की, बांधकाम करणाऱ्या कामगारांना साहित्य खरेदी, विवाह, प्रसुती, शस्त्रक्रिया आदीसाठी शासनाकडून मदत केली जात असल्याचे सांगितले. याच बरोबर कामगारांच्या पाल्याच्या शिक्षणासाठी तसेच अपघातात मृत्यु आल्यास वारसांना अर्थसहाय्य दिले जाते. शासनाच्या या योजनाचा लाभ करुन घेण्यासाठी असंघटीत कामगारांनी मनपा, नगरपालिका, ग्रामपंचायतीकडे नाव नोंदणी करुन प्रमाणपत्र घेण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले. मेळाव्याला शेख पाशा, नजीर शेख, बशीर शेख, राहुल ताकवाडले, सलीम शेख, माजीद शेख आदीसह कामगारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.