घाटीत विनामास्क रुग्ण, नातेवाइकांचा वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:22 IST2021-02-05T04:22:14+5:302021-02-05T04:22:14+5:30
आरोग्य उपसंचालक कार्यालातील स्वच्छतागृहाची दुरवस्था औरंगाबाद : आरोग्य उपसंचालक कार्यालयातील स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. स्वच्छतागृहात पाणी तुंबले असून, प्रचंड ...

घाटीत विनामास्क रुग्ण, नातेवाइकांचा वावर
आरोग्य उपसंचालक कार्यालातील स्वच्छतागृहाची दुरवस्था
औरंगाबाद : आरोग्य उपसंचालक कार्यालयातील स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. स्वच्छतागृहात पाणी तुंबले असून, प्रचंड अस्वच्छता पसरली आहे. देखभाल-दुरुस्ती, स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने कर्मचाऱ्यांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.
मोंढानाका उड्डाणपुलाखालील वाहतूक सिग्नल बंद
औरंगाबाद : मोंढानाका उड्डाणपुलाखालील वाहतूक सिग्नल गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे चारही बाजूंनी येणारी वाहने समोरासमोर येतात. त्यातून याठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. येथील वाहतूक सिग्नल सुरू करण्याची मागणी वाहनचालकांतून होत आहे.
रस्त्यावरच बांधकाम साहित्य पडून
औरंगाबाद : पोलीस आयुक्तालय ते ज्युबली पार्क रस्त्यावर ठिकठिकाणी बांधकाम साहित्य पडून आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे बांधकाम साहित्य हटविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करण्याची वेळ पादचाऱ्यांवर ओढावत आहे.
घाटीत सिमेंट पाईप पडून
औरंगाबाद : घाटीतील सुपर स्पेशालिटी ब्लॉकसमोरील कर्मचारी निवासस्थान परिसरात ठिकठिकाणी सिमेंटचे पाईप पडून आहेत. अनेक दिवसांपासून या पाईपकडे दुर्लक्ष होत आहे. त्यांचा योग्य वापरा करावा अथवा परिसरातून ते हटविण्यात यावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांतून होत आहे.