गावात अवैध बांधकाम केल्याने सरपंचासह सदस्यांचे पद रद्द...!
By Admin | Updated: December 23, 2016 00:19 IST2016-12-23T00:17:35+5:302016-12-23T00:19:28+5:30
भोकरदन : भोकरदन तालुक्यातील पेरजापूर ग्रामपंचयतीच्या सरपंच व सदस्यांनी गायरान जमिनीवर बेकायदेशीर बांधकाम केल्याच्या कारणावरून औरंगाबाद खंडपीठाने अपात्र ठरिवले आहे.

गावात अवैध बांधकाम केल्याने सरपंचासह सदस्यांचे पद रद्द...!
भोकरदन : भोकरदन तालुक्यातील पेरजापूर ग्रामपंचयतीच्या सरपंच व सदस्यांनी गायरान जमिनीवर बेकायदेशीर बांधकाम केल्याच्या कारणावरून औरंगाबाद खंडपीठाने अपात्र ठरिवले आहे.
या बाबतची माहिती अशी पेरजापूर येथील सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक झाल्यानंतर आत्माराम खेकाळे यांनी सरपंच कासाबाई तळेकर व सदस्य कृष्णा बुरंगे यांच्याविरूध्द गट नबंर १८१ मध्ये गायरान जमिनीमध्ये बेकायदेशीर आऱ सी़सी़ बांधकाम केल्याची तक्रार केली होती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंच व सदस्यांना अपात्र घोषित केले होते.
१० जून २०१६ ला अप्पर जिल्हाधिकारी एन. आर शेळके यांनी अपात्र ठरविले होते. त्यानंतर सरपंच आणि सदस्यांनी औरंगाबाद विभागीय कार्यालयातून स्थगिती मिळविली होती. तक्रारकर्ता आत्माराम केकाळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल केली. त्यानंतर कोर्टाने ३० नोव्हेंबर रोजी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवल. त्याला विभागीय आयुक्तानी स्थगिती दिली होती. त्यानंतर आखे पाटील यांनी उच्च न्यालयात धाव घेऊन सरपंच व सदस्य यांच्याविरूध्द अपील दाखल केले. त्यावर सुनावणी होऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेऊन सरपंच कासाबाई तळेकर व कृष्णा बुरंगे यांचे सदस्यपद अपात्र घोषित केले आहे़
यासदंर्भात सरपंच कासाबाई केशवराव तळेकर यांना विचारले असता आम्ही या निर्णयाविरूध्द सर्वोच्च न्यायालय अपिल करणार असल्याचे सांगितले. याची नुकतीच कोर्टातून निकालाची कॉफी मिळाल्याचे सांगण्यात येते. (वार्ताहर)