विद्यापीठाचे जीवनगौरव पुरस्कार जाहीर
By Admin | Updated: August 11, 2016 01:25 IST2016-08-11T01:22:41+5:302016-08-11T01:25:53+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ५८ वा वर्धापन दिन २३ आॅगस्ट रोजी साजरा होणार असून, यानिमित्त पाच मान्यवरांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

विद्यापीठाचे जीवनगौरव पुरस्कार जाहीर
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ५८ वा वर्धापन दिन २३ आॅगस्ट रोजी साजरा होणार असून, यानिमित्त पाच मान्यवरांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष डॉ. वेदप्रकाश यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी अॅड. भगवानराव देशपांडे (विधि), विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात (शिक्षण, विज्ञान), लातूरच्या विवेकानंद रुग्णालयाचे संस्थापक डॉ. अशोक कुकडे (वैद्यकीय सेवा, संशोधन व समाजकार्य), ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे (साहित्य लेखन), माजी कृषी आयुक्त तथा विद्यमान विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट (प्रशासन) यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल, अशी माहिती कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी दिली.