विद्यापीठाला सहा कोटींचा निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:27 IST2017-08-30T00:27:36+5:302017-08-30T00:27:36+5:30
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) कडून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठास ६ कोटी मंजूर झाले आहेत. रुसाकडून विद्यापीठातील भौतिक सुविधांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यामध्ये विद्यापीठास नवीन बांधकामासाठी २ कोटी १० लाख रुपये, नूतनीकरण व दर्जा सुधारण्यासाठी २ कोटी १० लाख, विविध उपकरणे खरेदीसाठी १ कोटी ८० लाख रुपये मंजूर झाले आहेत.

विद्यापीठाला सहा कोटींचा निधी मंजूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: केंद्र शासनाच्या राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) कडून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठास ६ कोटी मंजूर झाले आहेत.
रुसाकडून विद्यापीठातील भौतिक सुविधांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यामध्ये विद्यापीठास नवीन बांधकामासाठी २ कोटी १० लाख रुपये, नूतनीकरण व दर्जा सुधारण्यासाठी २ कोटी १० लाख, विविध उपकरणे खरेदीसाठी १ कोटी ८० लाख रुपये मंजूर झाले आहेत. या निधीमुळे विद्यापीठातील भौतिक तसेच शैक्षणिक सुविधांमध्ये वाढ होणार आहे. रुसाअंतर्गत घेण्यात येणाºया कामांचे नियंत्रण करण्यासाठी स्वतंत्र समिती असणार आहे.
या समितीचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर हे अध्यक्ष तर प्रभारी कुलसचिव डॉ. रमजान मुलानी सचिव असणार आहेत. तसेच विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे आणि विद्यापीठ अभियंता अरुण पाटील हे सदस्य असतील़
रुसाअंतर्गत राज्याच्या २५१ कोटी रुपयांच्या आराखड्यास सप्टेंबर २०१५ ला प्रकल्प मंजुरी मंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी मिळाली आहे. यामध्ये राज्यातील नऊ विद्यापीठे आणि पाच शासकीय महाविद्यालयांचा समावेश आहे. या अंतर्गत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला निधी मंजूर झाला आहे.