विद्यापीठातील संशोधन लेख, ग्रंथांचा दर्जा आंतरराष्ट्रीय असावा
By Admin | Updated: May 7, 2016 00:02 IST2016-05-06T23:30:01+5:302016-05-07T00:02:01+5:30
औरंगाबाद : विद्यापीठातील प्राध्यापक, संशोधकांनी लिहिलेले संशोधनपर लेख, ग्रंथांचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावर असला पाहिजे. तरच त्याची दखल घेतली जाऊ शकते,

विद्यापीठातील संशोधन लेख, ग्रंथांचा दर्जा आंतरराष्ट्रीय असावा
औरंगाबाद : विद्यापीठातील प्राध्यापक, संशोधकांनी लिहिलेले संशोधनपर लेख, ग्रंथांचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावर असला पाहिजे. तरच त्याची दखल घेतली जाऊ शकते, असे प्रतिपादन कुलगुरूडॉ. बी. ए. चोपडे यांनी गुरुवारी येथे केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागातील प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी माजी व्यवस्थापन परिषद सदस्य भाऊसाहेब राजळे, बीसीयूडी संचालक डॉ. के. व्ही. काळे, न्युरो सर्जन डॉ. जीवन राजपूत, डॉ. अरुण मारवले आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘इंटरॅक्शन टू ईईजी अॅण्ड स्पीच बेस्ड इमोशन रिकग्निशन’ या विषयावरील ग्रंथाचे लेखन प्रा. एस. सी. मेहरोत्रा, डॉ. भारती गवळी, प्रियंका अभंग यांनी केले आहे. ‘सिस्टीम कम्युनिकेशन अॅण्ड मशीन लर्निंग रिसर्च लॅबोरेटरी’अंतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कुलगुरू डॉ.चोपडे म्हणाले, अकॅडेमिक प्रेसच्या वतीने पुस्तक प्रकाशित होत असल्याचा आपल्याला अभिमान आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानांकनासाठी विद्यापीठातील संशोधक व प्राध्यापकांचे लेख, प्रकल्प, ग्रंथ हे दर्जेदार असणे गरजेचे आहे. तसेच पेटंट, कॉपी राईट, ट्रेड मार्क याला खूप महत्त्व आले आहे. अशा प्रकारच्या लेखनाला विद्यापीठाकडून प्रोत्साहन, अनुदान दिले जाईल, असे ते म्हणाले.
डॉ. मेहरोत्रा यांनी प्रास्ताविक केले. वैशाली जाधव यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. भारती गवळी यांनी आभार मानले.