विद्यापीठातील ३ प्राध्यापक घरी
By Admin | Updated: July 14, 2016 01:37 IST2016-07-14T01:34:02+5:302016-07-14T01:37:24+5:30
औरंगाबाद : राज्य शासनाने महाविद्यालयीन विद्यापीठीय प्राध्यापकाने निवृत्तीचे वय ६२ वरून ६० केल्याचा फटका डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील तीन प्राध्यापकांना बसला

विद्यापीठातील ३ प्राध्यापक घरी
औरंगाबाद : राज्य शासनाने महाविद्यालयीन विद्यापीठीय प्राध्यापकाने निवृत्तीचे वय ६२ वरून ६० केल्याचा फटका डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील तीन प्राध्यापकांना बसला असून, प्राणीशास्त्र विभागाचे डॉ. यशवंत खिल्लारे, संख्याशास्त्र विभागाचे डॉ. व्ही. एच. बजाज आणि प्राणीशास्त्र विभागाचेच डॉ. डी. एल. सोनवणे यांना गुरुवारी निवृत्त व्हावे लागेल.
राज्य शासनाने प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय ६२ वरून ६० करण्याचा निर्णय जून महिन्यात घेतला होता. मंगळवारी त्यासंबंधीचा अध्यादेश विद्यापीठाला प्राप्त झाला. हा अध्यादेश आल्यानंतर विद्यापीठाने तातडीने आदेशाची अंमलबजावणी केली. विद्यापीठातील प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. खिल्लारे, डॉ. बजाज आणि डॉ. सोनवणे यांना उद्या निवृत्तीसंबंधीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
१ एप्रिलनंतर ज्या प्राध्यापकांचे निवृत्तीचे वय ६२ करण्यासंदर्भात राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आले होते ते राज्य शासनाने नामंजूर केले आहेत. मात्र ज्यांचे वय ६० वर्षे पूर्ण होऊनही ज्यांचे प्रस्ताव एप्रिलआधीच मंजूर करण्यात आले आहेत.
त्यांना ६२ वर्षे वयापर्यंत काम करता येणार आहे. त्यामुळे कमी वय असलेले प्राध्यापक विद्यापीठातून निवृत्त झाल्याचे व अधिक वय असलेले प्राध्यापक विद्यापीठात कार्यरत असल्याचे चित्र आहे.