शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

‘अभाविप’च्या तिरंगा यात्रेसाठी विद्यापीठाने रासेयोच्या स्वयंसेवकांना केली सक्ती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 11:43 AM

राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी उपस्थित राहणे बंधनकारक केल्याचा आरोप रिपब्लिकन विद्यार्थी सेनेने केला.

औरंगाबाद : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या हिंदुत्ववादी संघटनेने आयोजित केलेल्या तिरंगा यात्रेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी उपस्थित राहणे बंधनकारक केल्याचा आरोप रिपब्लिकन विद्यार्थी सेनेने केला. याविषयीचे पत्र प्रभारी संचालक डॉ. टी. आर. पाटील यांनी १४ सप्टेंबर रोजी काढल्याचा दावाही सेनेचे पदाधिकारी सचिन निकम यांनी केला. 

‘अभाविप’तर्फे स.भु. महाविद्यालय ते क्रांतीचौक, अशी ११११ फूट लांबीच्या तिरंगा ध्वजाची यात्रा काढली होती. या यात्रेत विद्यापीठाच्या रासेयो स्वयंसेवकांना उपस्थित राहण्यासाठी संचालक डॉ. टी. आर. पाटील यांनी १४ सप्टेंबर रोजी कार्यालयीन परिपत्रकाद्वारे आदेश दिले. ‘एनएसएस’ला ‘आरएसएस’शी जोडण्याचा प्रकार बेकायदेशीर असून, त्यामुळे आंबेडकरी विद्यार्थ्यांमध्ये रोष निर्माण झाल्याचा दावाही निवेदनाद्वारे केला आहे. या निषेधार्थ आंदोलनाचा इशारा देण्यात आला. या निवेदनावर सचिन निकम, अ‍ॅड. अतुल कांबळे, अविनाश जगधने, अविनाश कांबळे, प्रा. प्रबोधन बनसोडे, कुणाल भालेराव, अ‍ॅड. प्रसेनजित एडके, सागर शहा, गजानन कांबळे,  महेंद्र तांबे, विवेक सोनवणे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

प्रभारी संचालकांना पदावरून हटवाविद्यापीठ प्रशासनाने केलेला प्रकार बेकायदेशीर आहे. यासाठी रासेयोचे प्रभारी संचालक डॉ. टी. आर. पाटील यांना पदावरून हटविण्याची मागणी संघटनेने केली. हा प्रकार कोणाच्या इशाऱ्यावर करण्यात आला, याचा जाबही कुलगुरूंना विचारण्यात येणार आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

आमचा उद्देश केवळ राष्ट्रभक्ती तिरंगा यात्रा ही कोणत्या पक्षाची म्हणून नव्हे तर तिरंग्याचा सन्मान करण्यासाठी मोठे काम उभे के ले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी पत्र काढले. आमचा उद्देश केवळ राष्ट्रभक्ती हाच आहे. पक्ष, संघटनांशी काहीही देणे-घेणे नाही.- डॉ. टी.आर.पाटील, प्रभारी संचालक, रासेयो 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ