शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
2
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
4
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
5
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
6
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
7
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
8
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
9
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
10
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
11
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
12
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
13
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
14
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
15
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
16
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
17
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
18
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
19
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
20
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठातील विभागांना नवीन विद्यार्थीच मिळेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 19:47 IST

रिक्त जागांवर सीईटीशिवाय ९ आॅगस्टपर्यंत प्रवेश

औरंगाबाद : डॉ़ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विविध विभागांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्यामुळे अनेक जागा रिक्त आहेत. या जागा भरण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने दुसऱ्यांदा प्रवेशाला मुदतवाढ दिली आहे. ९ आॅगस्टपर्यंत आता प्रवेश घेता येणार आहेत.

‘प्रवेशपूर्व परीक्षा’ (सीईटी) न दिलेल्या विद्यार्थ्यांनाही संबंधित विभागात अर्ज, कागदपत्रे दाखल करून प्रवेश देण्यात येईल. विद्यापीठातील मुख्य परिसर व उस्मानाबाद उपपरिसरातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी गेल्या महिन्यात प्रवेशपूर्व परीक्षा सीईटी घेण्यात आली. पदवी अभ्यासक्रमाचे निकाल लावण्यास विलंब झाल्याने प्रवेश प्रक्रिया लांबली होती़  तीन टप्पे होऊनही काही विभागात जागा रिक्त राहिल्या होत्या. 

यासंदर्भात मुदत वाढविण्याची मागणी काही विभागप्रमुख, विद्यार्थ्यांनी केली होती. यानंतर कुलगुरू डा़ॅ  प्रमोद येवले यांनी रिक्त जागांवर इच्छुक विद्यार्थ्यांनाही प्रवेश देण्याचे आदेश दिले आहेत. नव्या बदलानुसार ९ आॅगस्टपर्यंत प्रवेश देण्यात येणार आहे. १० आॅगस्ट रोजी विभागप्रमुखाना कुलगुरूंकडे अहवाल सादर करावे लागणार आहेत़  विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावरील फॉर्म व कागदपत्रांसह संबंधित विभागात संपर्क साधण्याचे आवाहन पदव्युत्तर विभागातर्फे कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी केले आहे.

नव्या परिपत्रकातील मुद्देज्या विभागातील पदव्युत्तर प्रवेशासाठी व एम.फिल. या अभ्यासक्रमांसाठी प्रवेशाची जागा रिक्त असेल अशा शैक्षणिक विभागप्रमुखांनी सदरील रिक्त जागेवर ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व परीक्षा दिलेली आहे, अशा विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य देऊन शासनाच्या आरक्षण धोरणानुसार व विद्यापीठाच्या प्रवेशाविषयीच्या नियमानुसार प्रवेश दिले जावेत.ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व परीक्षा दिलेली नसेल तर अशा विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षा न घेता संबंधित विद्यार्थ्यांच्या पदवी परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणानुसार गुणवत्ता यादी तयार करून या रिक्त जागा  गुणानुक्रमे भरण्यात याव्यात. विभागातील पदव्युत्तर व एम.फिल. या अभ्यासक्रमांसाठी शासनाने व विद्यापीठाने निश्चित केलेल्या प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त जागेवर कोणत्याही विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये. विद्यार्थ्यांचा वाढीव जागेवर अथवा वाढीव कोट्यातून प्रवेश देण्याबाबतचा अर्ज विद्यापीठ प्रशासनाकडे पाठविण्यात येऊ नये, अशा सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय