शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

विद्यापीठात प्रवेशोत्सव सुरु; ‘एकाच छताखाली’ सर्व सुविधा,संघटनांचा विद्यार्थ्यांना मदतीचा हात

By योगेश पायघन | Updated: September 1, 2022 13:14 IST

२०२२-२३ साठी इतर विद्यापीठ कोट्याची प्रवेश फेरी आज सकाळपासून विद्यापीठाच्या नाट्यगृहात सुरु झाली आहे.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला आजपासून सुरुवात झाली. ‘एकाच छताखाली’ सर्व सुविधा देऊन हाेणाऱ्या या प्रवेशोत्सवात वसतिगृहाचे देखील प्रवेश दिले जाणार आहेत. अनेक विद्यार्थी आणि पालक पहिल्यांदाच विद्यापीठात आले असल्याने त्यांच्या मदतीला संघटना धावून आल्या असून सत्यशोधक विद्यार्थी संघटना,  स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया यांनी विद्यार्थी मदत केंद्र सुरु केली आहेत.

२०२२-२३ साठी इतर विद्यापीठ कोट्याची प्रवेश फेरी आज सकाळपासून विद्यापीठाच्या नाट्यगृहात सुरु झाली आहे. सुमारे १ हजार २०० विद्यार्थी त्यात सहभागी होतील. या फेरीतील रिक्त जागा विद्यापीठ क्षेत्रासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर करण्यात आली. विद्यापीठ क्षेत्रातील प्रवेश विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखा, मानव्य विद्याशाखा, वाणिज्य विद्याशाखा आणि आंतर विद्याशाखांसाठी ३ ते ५ सप्टेंबरला प्रवेश प्रक्रिया होईल.

दरम्यान, आज सकाळपासूनच बाहेरगावाहून विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी आले आहेत. यामुळे चहा नाष्ट्याचे काही स्टॉल सुरू झाले आहेत. मात्र, येथे चालक चहा, नाष्ट्यासाठी दुप्पट दर आकारळे जात असल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली.

संघटनांचे विद्यार्थी मदत केंद्रविद्यापीठातील विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू झाले आहे.मात्र बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यानं अनेक अडचणी येत आहे. विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे राम सूर्यवंशी, श्रद्धा खरात, पूजा सोनकांबळे, निशिकांत कांबळे, अमोल खरात तर स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया संघटनेचे अशोक शेरकर, विश्वजीत काळे,  मुनीर सय्यद, सौरभ श्रीभाते, किसन करंडे, गणेश अल्गुडे, गजानन शिंदे, अनिकेत कुहिरे,  सत्यजित मस्के यांनी विद्यार्थी मदत केंद्र सुरू केले आहे.  यातून विद्यार्थांना मार्गदर्शन व मदत केली जात आहे.

वेळापत्रकानुसारच विद्यार्थ्यांनी येण्याचे आवाहनविज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेत २९ अभ्यासक्रमांसाठी २ हजार १३३, मानव्य विज्ञान विद्याशाखेतील २० अभ्यासक्रमासाठी ९६६, आंतरविद्या शाखेतील ११ अभ्यासक्रमासाठी ४९३ विद्यार्थ्यांचे अर्ज आहेत. वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेत ३ अभ्यासक्रमांसाठी २४६ अर्ज आलेले आहेत. एकूण ३ हजार ८३८ विद्यार्थी सहभागी होणार आहेत. अपूर्ण अर्जांची संख्या २ हजार ८७४ एवढी आहे. विद्यापीठ क्षेत्रातील ३ हजार ८३८ विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर केली. विविध ६८ अभ्यासक्रमांसाठी सुमारे ४ हजार विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेत सहभागी झाले आहेत. वेळापत्रकानुसार ठरवून दिलेल्या ठिकाणी आवश्यक कागदपत्रांसह विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन प्रवेश समितीकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबाद