पवार, अमरसिंह यांच्यात छुपी युती- बदामराव
By Admin | Updated: January 24, 2017 23:37 IST2017-01-24T23:36:04+5:302017-01-24T23:37:56+5:30
गेवराई : आ. अमरसिंह पंडित व आ.लक्ष्मण पवार हे वरुन विरोध दाखवतात, मात्र त्यांच्यात छुपी युती असल्याचा दावा माजी मंत्री बदामराव पंडित यांनी मंगळवारी केला.

पवार, अमरसिंह यांच्यात छुपी युती- बदामराव
गेवराई : आ. अमरसिंह पंडित व आ.लक्ष्मण पवार हे वरुन विरोध दाखवतात, मात्र त्यांच्यात छुपी युती असल्याचा दावा माजी मंत्री बदामराव पंडित यांनी मंगळवारी केला.
राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन बदामराव पंडित यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी जि.प. सदस्य युधाजित पंडित, अभिजीत पंडित, रोहित पंडित, महादेव औटी आदी उपस्थित होते. पालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेवरुन आ. लक्ष्मण पवार व आ. अमरसिंह पंडित यांच्यात जुंपलेले असतानाच या वादात बदामराव पंडित यांनीही उडी घेतली. ते म्हणाले, अमरसिंह पंडित व लक्ष्मण पवार गेवराईचा विकास करीत शकत नाहीत. तू पालिका बघ, मी बाकीचे पाहतो, असा या दोघांचा कारभार सुरू असल्याची घणाघाती टीकाही त्यांनी केली. या दोघांनाही विकास कामे राबविण्यात अपयश आल्याचे ते म्हणाले. सेनेच्या माध्यमातून येत्या निवडणुकीत ताकद दाखवून देऊ, असा इशाराही त्यांनी दिला. (वार्ताहर)