रामनगरात टरबूज शेतीचा अनोखा प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:05 IST2021-03-04T04:05:06+5:302021-03-04T04:05:06+5:30
वासडी : पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून कायमच शेतकरी नवीन प्रयोग करीत असतात. असाच अनोखा प्रयोग रामनगर येथील विनोद ...

रामनगरात टरबूज शेतीचा अनोखा प्रयोग
वासडी : पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून कायमच शेतकरी नवीन प्रयोग करीत असतात. असाच अनोखा प्रयोग रामनगर येथील विनोद भुसारे या तरुण शेतकऱ्याने केला आहे. त्यांनी तीस गुंठे जमिनीवर टरबुजाची लागवड केली असून, भर उन्हाच्या कडाक्यात टरबूज लागवडीचा त्यांना उपयोग होणार आहे.
उन्हाळ्यात टरबुजाच्या फळाला प्रचंड मागणी असते. त्यामुळे उन्हाळ्यात टरबुजाला चांगला भाव मिळतो. विशेष म्हणजे, कमी क्षेत्रातून जास्त उत्पन्न मिळत असल्याने शेतकरी टरबूज लागवड करतात. मात्र, त्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे पारंपरिक पिकांबरोबरच अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी रामनगर येथील शेतकरी विनोद भुसारे यांनी टरबूज लागवड केली. त्या सोबतच आंतरपीक म्हणून मिरचीचीही लागवड केली. त्यामुळे दोन्ही पिके चांगली बहरले आहे. साधारण दीड महिन्यांपूर्वी लागवड केलेल्या टरबूज पीक आता बहरले आहे. त्यामुळे टरबूज व मिरची ही दोन्ही पिके चांगले उत्पादन देतील, अशी आशा त्यांना आहे. विशेष म्हणजे, हा प्रयोग रामनगर शिवारात प्रथमच त्यांनी केला असल्याने आजूबाजूचे शेतकरी त्यांची शेती पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत. पुढच्या वेळेला आपणही असाच प्रयोग करू, असे सांगून भुसारे यांचे कौतुक करीत आहेत.