शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल, राजकीय घडामोडींना वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 00:20 IST

Union Home Minister Amit Shah : आज रात्री अमित शाह छत्रपती छत्रपती संभाजीनगरमध्येच मुक्कामी असणार आहेत.

Union Home Minister Amit Shah : छत्रपती संभाजीनगर :  आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे भाजपाकडूनअमित शाह यांच्या दौऱ्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, आज रात्री अमित शाह हे छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आगमन झाल्यानंतर अमित शाह यांचे स्वागत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री भागवत कराड, रावसाहेब दानवे यांनी केले. यावेळी राज्यमंत्री अतुल सावेही उपस्थित होते.

आज रात्री अमित शाह छत्रपती छत्रपती संभाजीनगरमध्येच मुक्कामी असणार आहेत. उद्या सकाळी अमित शाह अकोला आणि जळगावमधल्या सभेला जाणार आहेत. उद्या सकाळी १० वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून अकोला शहराकडे ते रवाना होतील. तेथून पुन्हा सायंकाळी ५ वाजता छत्रपती संभाजीनगर शहरात येतील. सव्वासहा वाजता क्रांतीचौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पूतळ्यास अभिवादन केल्यानंतर मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर एका सभेला उपस्थित राहणार आहेत. सभा संपल्यानंतर रात्री आठ वाजेच्या सुमारास अमित शाह दिल्लीला रवाना होतील. 

दरम्यान, अमित शाह यांच्या दौऱ्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. सभेसाठी होणाऱ्या संभाव्य गर्दीमुळं शहरातील वाहतुकीमध्ये उद्या दुपारपासून रात्री १२ वाजेपर्यंत बदल करण्यात आला आहे. तसेच शहरात पोलिस आयुक्तांनी नो ड्रोन झोन प्रतिबंधक आदेशही लागू केले आहेत. दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अमित शाह यांच्या या महाराष्ट्र दौऱ्यात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागावाटपाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार का? याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शाहMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपाAkolaअकोला