चतुर्थीनिमित्त राजूरसाठी विनावाहक बससेवा
By Admin | Updated: May 21, 2016 23:57 IST2016-05-21T23:40:18+5:302016-05-21T23:57:08+5:30
जालना : संकष्ट चतुर्थीनिमित्त श्री राजूर येथे गणपती दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी जालना ते राजूर दरम्यान विना वाहक बससेवा मिळणार आहे.

चतुर्थीनिमित्त राजूरसाठी विनावाहक बससेवा
जालना : संकष्ट चतुर्थीनिमित्त श्री राजूर येथे गणपती दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी जालना ते राजूर दरम्यान विना वाहक बससेवा मिळणार आहे. जालना स्थानकातून तिकीट काढल्यानंतर राजूर येथे थेट उतरता येणार आहे.
राजूरेश्वर मराठवाड्याचे आराध्य दैवत आहे. चतुर्थीनिमित्त हजारो भाविक दर्शनासाठी येतात. प्रवाशांना राजूर येथे सुलभ जाता यावे म्हणून संकष्ट चतुर्थी म्हणजे २५ मे रोजी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी जालना आगारातून जालना ते राजूर दरम्यान पाच गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक पी.पी. भुसारी व आगारप्रमुख एस.जी. मेहेत्रे यांनी केले आहे.